Pune Shocker: प्रियकराने लग्नास नकार दिल्याने 19 वर्षीय तरुणीने आत्महत्या

मुलीने त्याला लग्न करण्यास सांगितले होते. परंतु, सुबोधने आणि त्याच्या नातेवाईकांने या लग्नास नकार दिला. पीडितेने लग्नाचा आग्रह करूनही सुबोध तिच्याशी लग्न करणार नाही यावर ठाम राहिला.

Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Pune Shocker: प्रियकराने लग्नास नकार दिल्याने एका 19 वर्षीय तरुणीने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. शनिवारी दुपारी पुण्यातील हिंजवडी (Hinjewadi) मध्ये ही घटना घडली. मूळचा हिंजवडी येथील धाराशिव जिल्ह्यातील भोगलगाव येथील रहिवासी असलेल्या मुलीच्या वडिलांनी रविवारी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

या तक्रारीवरून पोलिसांनी हिंजवडी येथील साखरे बस्ती येथे राहणारा सुबोध सुधीर साखरे (वय, 25) आणि रोहन सुदाम पारखी (वय 30, रा. मुलाणी वस्ती, माण, ता. मुळशी) यांना अटक केली आहे. त्यांच्यासह सुधीर साखरे, सुबोध साखरे यांची आई आणि अन्य एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा -Pune Vanraj Andekar murder: पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या,आरोपी फरार)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे सुबोध साखरेसोबत अनेक वर्षांपासून संबंध होते. मुलीने त्याला लग्न करण्यास सांगितले होते. परंतु, सुबोधने आणि त्याच्या नातेवाईकांने या लग्नास नकार दिला. पीडितेने लग्नाचा आग्रह करूनही सुबोध तिच्याशी लग्न करणार नाही यावर ठाम राहिला. यामुळे मुलीने राहत्या घरी दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. (हेही वाचा - Borivali Molestation Case: बोरिवली मध्ये 15 वर्षीय मुलीची शाळेत जाताना रिक्षा चालकाकडून विनयभंग; अज्ञात रिक्षाचालका विरूद्ध गुन्हा दाखल)

दरम्यान 29 ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी 10 जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. कलाम इझार मन्सुरी नावाच्या 22 वर्षीय व्यक्तीने पाठलाग करून धमक्या दिल्याने मुलीने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापी, आरोपींवर भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 107, 351 (2), 3 (5), आणि 78 आणि POCSO कायदा, 2012 च्या कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.