Mumbai Shocker! घरच्यांनी मोबाईल फोन वापरण्यास बंदी घातल्याने 15 वर्षीय मुलीची 7 मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
Mumbai Shocker: प्रत्येकाला मोबाईल फोन (Mobile Phone) वापरण्याचे इतके व्यसन लागले आहे की लोकांना त्याशिवाय काहीतरी अपूर्ण वाटते. जो कोणी पाहावं तो सतत मोबाईलमध्ये मग्न असतो. मोठ्यांव्यतिरिक्त लहान मुलांनाही मोबाईलचे व्यसन लागले आहे. दरम्यान, मोबाईल वापरण्यास परवानगी नाकारल्याने संतापलेल्या तरुणीने आत्महत्या (Suicide)केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील (Mumbai) मालाड (Malad)मधून समोर आली आहे.
वृत्तानुसार, मालाडच्या मालवणी येथे एका 15 वर्षीय मुलीने मोबाईल फोन वापरण्यास नकार दिल्याने सात मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा -Mumbai: पत्नीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन 56 वर्षीय पत्नीच्या चेहऱ्यावर अॅसिड हल्ला)
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना शुक्रवारी सायंकाळी पश्चिम उपनगरातील मालवणी परिसरात घडली. मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तिच्या पालकांचा शोध घेतला.
मुलीच्या आत्महत्येमागचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नसून, तपास अधिकाऱ्यावर विश्वास ठेवायचा झाल्यास, तिच्या कुटुंबीयांनी तिचा मोबाईल हिसकावून घेतला होता. त्यामुळे मृत तरुणी नाराज होती. यातून तिने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.