Coronavirus: पुणे शहरात कोरोना विषाणूचा कहर; गेल्या 24 तासात आणखी 99 रुग्णांची नोंद तर, 7 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण पसरले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) शहरात आढळून आले आहेत.
कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) हादरून सोडले आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण पसरले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) शहरात आढळून आले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात आणखी 99 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 300 वर पोहचली आहे. यापैकी 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 665 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे पुणे शहरात एकच खबबळ उडाली आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून कठोर पाऊले उचलली जात आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 700 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.
राज्यात करोनाग्रस्तांची संख्या आता 16 हजार 756 वर पोहोचली आहे. राज्यात एका दिवसात 1 हजार 233 करोनाचे नवे रुग्ण सापडले असून 34 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे. यापूर्वी राज्यातील 700 करोनाग्रस्तांना उपचारानंतर बरे करून घरी सोडण्यात आल्याचे यापूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. तसेच बुधवारी 275 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. राज्यात करोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ होत असल्याचेही टोपे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Lockdown: लॉकडाऊन काळात गरज नसताना बाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांवर रायगड पोलिसांकडून कारवाई; एक कोटी पेक्षा अधिक दंडाची रक्कम वसूल
एएनआयचे ट्वीट-
पुणे शहरातील जे भाग करोना विषाणूने संक्रमित आहेत, ते सोडून इतर भागातील सर्व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत, असा आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना काढला आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. पुणे शहरात करोना विषाणूंच्या वाढत्या रुग्णांच्या संख्या लक्षात घेता. केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार सर्व निर्णय घेतले जात आहेत. आजवर देशभरात 40 दिवसापांसून सर्व व्यवहार ठप्प असून अशीच परिस्थिती पुणे शहरात देखील आहे. अर्थ व्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने अनेक पावले उचलली जात आहेत, असे शेखर गावकवाड म्हणाले आहेत.