MSRTC Mega Bharti 2019 मध्ये 932 महिलांनी केले ST बस ड्रायव्हर पदासाठी अर्ज, पहिल्यांदाच येणार एसटीचं सारथ्य महिलांच्या हाती
महाराष्ट्रभरातून 8022 जागांसाठी नोकरभरती जाहीर केली होती. त्यापैकी नोकरीमध्ये महिलांना 30% आरक्षण असल्याने 2406 पदांसाठी महिला जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. मात्र सध्या 932 महिलांनी अर्ज दाखल केले आहेत.
लवकरच MSRTC च्या एसटी बसचं सारथ्य महिलांच्या हाती देण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील जिल्ह्यांसोबत राज्यात विविध ठिकाणी कंडक्टर, बस ड्रायव्हर या पदांसाठी नोकरभरती जाहीर करण्यात आली होती. यामध्ये महिलांना एसटी ड्रायव्हरच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली होती. त्यानुसार यंदा सुमारे 900 हून अधिक महिलांनी एसटी ड्रायव्हर - कंडक्टर पदासाठी अर्ज केले आहेत. महामंडळाच्या 8022 चालक -वाहक पदाच्या भरतीसाठी राज्यभरातून सुमारे 42 हजार अर्ज आले आहेत. MSRTC Mega Bharti 2019: एसटी महामंडळाच्या मेगा भरती मध्ये महिला उमेदवारांसाठी शिथिल झाले नियम
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)