Jitendra Awhad On New Criminal Laws: '90 दिवसांची पोलीस कोठडी आयुष्य उद्ध्वस्त करणार'; नवीन फौजदारी कायद्यांवरून जितेंद्र आव्हाड यांचा केंद्र सरकारवर निशाणा

नवीन फौजदारी कायद्यानुसार, सामान्य गुन्ह्यांसाठीही पोलिस कोठडीची कमाल मुदत 15 दिवसांवरून 60 दिवस किंवा 90 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. 90 दिवसांची पोलीस कोठडी आयुष्य उद्ध्वस्त करणार, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Jitendra Awhad (PC - Facebook)

Jitendra Awhad On New Criminal Laws: 1 जुलैपासून नवे फौजदारी कायदे (New Criminal Laws) लागू होणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केंद्र सरकारवर (Central Government) निशाणा साधला आहे. या कायद्यांबाबत जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. नवीन फौजदारी कायद्यानुसार, सामान्य गुन्ह्यांसाठीही पोलिस कोठडीची कमाल मुदत 15 दिवसांवरून 60 दिवस किंवा 90 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. 90 दिवसांची पोलीस कोठडी आयुष्य उद्ध्वस्त करणार, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

न्यूज एजन्सी एएनआयच्या रिपोर्टनुसार, 'सीआरपीसी बदलण्यासाठी हा कायदा आहे. हा कायदा जुना असल्याचे केंद्रीय नेते सांगत आहेत. आता 90 दिवसांची पोलिस कोठडी राहणार आहे. एखाद्या छोट्या गुन्ह्यासाठी त्यांना 90 दिवस ठेवले तर तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल. विशेषत: आमच्यासारखे राजकीय कार्यकर्ते, जे विरोधाचा आवाज आहेत. आमचा आवाज दाबण्यासाठी आम्हाला 90 दिवसांसाठी ताब्यात ठेवता येईल,' असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Jitendra Awhad Threat : जितेंद्र आव्हाड बिष्णोई गँगच्या रडारवर, लाखोंची मागणी; पैसे न दिल्यास सलमान खानसारखं प्रकरण करू )

जितेंद्र आव्हाड ट्विट - 

सरकार संविधान बदलणार - जितेंद्र आव्हाड

सप्टेंबरमध्ये आमच्यासारख्या 10 जणांना उचलून ताब्यात घेतले, तर आम्ही निवडणूक लढवू शकणार नाही. आम्ही 3 महिने आत राहिलो तर निवडणूक कोठून लढणार? भाजप नेत्यांनी सांगितले की ते मुस्लिम पर्सनल लॉ रद्द करणार आहेत, याचा अर्थ ते संविधान बदलणार आहेत, असा दावाही आव्हाड यांनी केला आहे.

दरम्यान, भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी संरक्षण संहिता 2023 आणि भारतीय पुरावा कायदा 2023 हे तीन कायदे 1 जुलैपासून लागू होतील. हे कायदे पूर्वीच्या की भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आणि भारतीय पुरावा कायदा 1872 फौजदारी कायद्यांची जागा घेतील. भारतीय नागरी संरक्षण संहितेनुसार, गुन्ह्याच्या स्वरूपावर अवलंबून सामान्य फौजदारी कायद्यांतर्गत पोलिस कोठडी 15 दिवसांवरून 90 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. (हेही वाचा - BJP on Jitendra Awhad's Controversial Remark: भाजपा कडून जितेंद्र आव्हाडांचा राज्यभर निषेध; अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांकडून आंदोलनं)

भारतीय न्यायिक संहितेत असणार 358 कलमे -

भारतीय न्यायिक संहितेत 358 कलमे असणार आहेत. तथापी, पूर्वीच्या आयपीसीमध्ये 511 कलमे होती. या कायद्यातील कलमे कमी करण्यात आली आहेत. विधेयकात एकूण 20 नवीन गुन्ह्यांची भर पडली असून त्यातील 33 गुन्ह्यांची तुरुंगवासाची शिक्षा वाढवण्यात आली आहे. 83 गुन्ह्यांमध्ये दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली असून 23 गुन्ह्यांमध्ये किमान शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच 19 कलमे रद्द किंवा काढून टाकण्यात आली आहेत.