Coronavirus Update: कोरोना रुग्णसंख्या 9 लाखाच्या पार; महाराष्ट्रात तुमच्या जिल्ह्यात किती कोरोनाबाधित आहेत जाणुन घ्या

राज्यात कालच्या दिवसभरात आजवरची सर्वाधिक म्हणजेच 23,350 इतक्या कोरोना व्हायरस संक्रमितांची नोंद (Coronavirus Cases In Maharashtra) झाली ज्यानुसार राज्यातील कोरोना रुग्णांंचा एकुण आकडा 9 लाखाच्या पार गेला आहे.

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus Update In Maharashtra: राज्यात कालच्या दिवसभरात आजवरची सर्वाधिक म्हणजेच 23,350 इतक्या कोरोना व्हायरस संक्रमितांची नोंद (Coronavirus Cases In Maharashtra) झाली ज्यानुसार राज्यातील कोरोना रुग्णांंचा एकुण आकडा 9 लाखाच्या पार गेला आहे. सद्य घडीला पाहायला गेल्यास आजवर राज्यात एकुण 9 लाख 7 हजार 212 कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत. यापैकी कालच्या दिवसात झालेले 328 मृत्यु धरुन 26, 604 जणांंचा कोरोनामुळे बळी (Coronavirus Deaths)  गेला आहे. तर दिलासादायक बाब अशी की, एकुण संख्येतील 6,44,400 जणांंनी आजपर्यंत कोरोनावर मात (COVID 19 Recovered Cases) केली आहे. यातील 7,826 जणांना तर मागील 24 तासात डिस्चार्ज मिळाला आहे.

Oxygen Supply: महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्राला मिळणार 80 % कृत्रिम ऑक्सिजन सिलेंडर- आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढीच्या आकड्यात मुंंबई आणि पुणे शहरात चढाओढ दिसुन येतेय. काल मुंंबईत 1910 तर पुणे विभागात 4,447 नव्या कोरोना रुग्णांंची वाढ झाली होती, याशिवाय इतरही जिल्हा व मनपा विभागात रोज रुग्ण आढळत आहेत. या परिस्थिती मध्ये कोणत्या जिल्ह्यात किती कोरोनाबाधित आहेत हे खालील तक्ता पाहुन जाणुन घ्या. मुंबईतील धारावीत कोरोनाचे आणखी 6 रुग्ण आढळल्यानंतर आकडा 2819 वर पोहचला; BMC ची माहिती

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांंची जिल्हानिहाय आकडेवारी

 

जिल्हा उपचार सुरू मृत्यू बरे झालेले रुग्ण संक्रमित रुग्ण
अहमदनगर 5901 354 18336 24591
अकोला 1038 164 3200 4403
अमरावती 1331 146 4487 5964
औरंंगाबाद 5856 696 18639 25191
बीड 1556 148 3922 5626
भंडारा 938 27 806 1771
बुलडाणा 1343 86 2717 4146
चंद्रपुर 2278 25 1550 3853
धुळे 2520 230 6800 9552
गडचिरोली 245 1 708 954
गोंंदिया 1075 23 1135 2233
हिंंगोली 349 41 1374 1764
जळगाव 8113 928 22473 31514
जालना 1631 149 3290 5070
कोल्हापुर 8129 778 18031 26938
लातुर 3708 310 6009 10027
मुंंबई 23939 7869 123478 155622
नागपुर 17086 900 20154 38144
नांदेड 4544 259 4397 9200
नंंदुरबार 1307 84 1892 3283
नाशिक 10182 962 34646 45790
उस्मानाबाद 2455 209 4608 7272
पालघर 6061 641 21316 28018
परभणी 1128 100 2155 3383
पुणे 61383 4429 133491 199303
रायगड 8401 835 25743 34981
रत्नागिरी 2132 162 2681 4975
सांगली 8320 561 9720 18601
सातारा 7419 425 10775 18621
सिंधुदुर्ग 970 24 764 1758
सोलापुर  6000 841 16019 22861
ठाणे 24941 3964 114272 143178
वर्धा 633 23 855 1512
वाशिम 562 36 1527 2126
यवतमाळ 1584 92 2430 4106
अन्य जिल्हे 799 82 0 881
एकुण 235857 26604 644400 907212

दरम्यान, राज्यात सद्य घडीला रुग्ण वाढ होत असली तरी सोबतच रिकव्हरी रेट (71.03%) सुद्धा आश्वासक आहे, तर मृत्युदर हा अवघा 2.98% आहे. राज्यात आता 2,35,857 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असुन हा टक्का सुद्धा एकुण रुग्णांंच्या तुलनेत केवळ 22 % आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now