Roha News: 6 हजाराची मागणी भोवली, रोहात फौजदार रंगेहात पकडला
रायगड जिल्ह्यात रोहा पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार यांना ६ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडेल आहे.
Roha News: रायगड जिल्ह्यात रोहा पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार यांना 6 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडेल आहे. अटकेपासून सुटका करण्यासाठी तसेच मदत म्हणून 6 हजार मागितल्या प्रकरणी फौजदाराला रंगेहात पकडले आहे. गोविंद रघूनाथ मदगे असे या फौजदाराचे नाव असून ते रायगड जिल्ह्यातील रोहा पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार पदावर कामाला होते. या घटनेनंतर पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- तामिळनाडूमध्ये ED च्या अधिकाऱ्याला 20 लाख रुपयांची लाच घेताना अटक
मिळालेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून फौजदाराला रंगेहात पकडले आहे. पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांनी ही कारवाई केली. तक्रारदार यांचे वडिल कांतीलाल तुकाराम वाघमारे यांनी त्यांची पत्नी प्रवीणा कांतीलाल यांच्या विरुध्द 4 मार्चला वादविवाद तसेच झटापट केल्या बाबतची तक्रार रोहा पोलिस ठाण्यात दिली. याबाबत रोहा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची तक्रार नोंदवली. प्रवीणा वाघमारे यांना अटक करावी लागणार असं घाबरवण्यात आले होते.
त्यानंतर फौजदाराने अटक नको असेल तर 10 हजार रुपयांची मागणी केली. गोविंद मदगे यांनी तक्रारदाराला धमकवण्याचा देखील प्रयत्न केला. त्यानंतर तक्रारदाराने कसे तरी 6 हजार रोख रुपये देण्याचे ठरले. दरम्यान लालूचपत विभागाने सापळा रचून फौजदाराला रंगेहात पकडले. लाचलुचपत विभागाकडून शशिकांत पाडावे, स. फौ. विनोद जाधव, स. फौ. शरद नाईक, पो. ह. महेश पाटील, पो. ह. कौस्तुभ मगर यांच्या पथकाच्या सहाय्याने हा गुन्हा रंगेहात पकडला.