Maharashtra: मालेगाव येथे झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू, 4 जण गंभीर जखमी
रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. चाळीसगाव तालुक्यातील मुंडखेडा येथे राहणारे भाविक चंदनपुरीच्या खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी आले होते.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon) तालुक्यातील चंदनपुरीजवळ देवाचे दर्शन घेऊन टेम्पोकडे परत जात असताना झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. चाळीसगाव तालुक्यातील मुंडखेडा येथील रहिवासी असलेले हे भाविक चंदनपुरीच्या खंडेराव महाराजांचे दर्शन घेऊन टेम्पोमधून परतत असताना गिगाव फाट्यावर भरधाव वेगात येणाऱ्या पिकअप वाहनाने पाठीमागून आलेल्या टेम्पो पिकअप वाहनाला धडक दिली. त्यामुळे टेम्पोमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींवर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. चाळीसगाव तालुक्यातील मुंडखेडा येथे राहणारे भाविक चंदनपुरीच्या खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी आले होते.
खंडेराव महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर ते गावाकडे निघाले. हे लोक गिगाव फाट्याजवळ आले असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाने टेम्पोला धडक दिली. यामुळे टेम्पो लगेच पलटी झाला. या धडकेने मोठा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळाकडे धावले. त्या स्थानिकांनी जखमींना टेम्पोतून बाहेर काढले आणि तालुका पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र टेम्पोमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (हे ही वाचा Maharashtra Rain Update: पुढील 2 ते 3 दिवसात पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याची माहिती)
कारवाईसाठी जात असताना झालेल्या भीषण अपघातात मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू, एक जण जखमी
असाच आणखी एक अपघात महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात घडला आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी जात असताना झालेल्या भीषण अपघातात एका विभागीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. यात तहसीलदार गंभीर जखमी झाले आहेत.