Matheran Shocker: माथेरान मध्ये तरूणीची निर्घुण हत्या; शीर कापलेल्या विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

पोलिसांच्या माहितीनुसार धारदार चाकूने गळा कापण्यात आला असून अद्याप शीर सापडलेले नाही. मृत मुलीचे नाव पूनम पाल आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

रविवारी सकाळी माथेरान (Matheran)  येथील लॉजवर एका 30 वर्षीय मुलीचा मृतदेह विचित्र अवस्थेमध्ये आढळला आहे. या मुलीचं शीर छाटलेलं तर अंगावरचे कपडे काढलेले होते. TOI च्या वृत्तानुसार ही मुलगी मुंबई च्या गोरेगाव मधील आहे. खोट्या नावाने लॉजमध्ये नोंद केलेला तिचा मित्र फरार आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार धारदार चाकूने गळा कापण्यात आला असून अद्याप शीर सापडलेले नाही. मृत मुलीचे नाव पूनम पाल आहे. मुलीची ओळख लपवण्यासाठी आरोपी तिचे सारे कपडे आणि वस्तू घेऊन फरार झाला आहे. CCTVमध्ये दोघे मास्क घातलेले दिसत आहेत. लॉजवर त्यांच्याकडून कोणतेही ओळखपत्र घेण्यात आलेले नाही. त्यामुळे सुरूवातीला तपासाला उशिर होत होता पण आता पोलिसांच्या हाताला एक हॅन्डबॅग लागली आहे. ही हॅन्डबॅग लॉजपासून 50 मीटर अंतरावर सापडली आहे. Mumbai Crime: मालाडमध्ये एका व्यक्तीकडून टेप रेकॉर्डरचा आवाज कमी करण्यास नकार दिल्याने शेजारच्याची हत्या, आरोपीला अटक .

लॉज मालकाला मुलीचा मृतदेह सकाळी रूम सर्व्हिस साठी गेले असता सापडला आहे. Dasturi naka CCTV मध्ये त्याच्या एंट्रीची झलक पहायला मिळाली आह पण त्यान पळ इतर मार्गाने काढला आहे. आरोपीचा शोध अद्याप लागलेला नाही. त्याला पकडण्यासाठी 5 जणांची टीम तैनात करण्यात आली आहे. माथेरान मध्ये मुंबई पोलिसांच्या 3 आणि रायगड पोलिसांच्या 2 तुकड्या शोध घेत आहेत.पनवेलच्या हॉस्पिटलमध्ये मुलीचा मृतदेह पोस्टमार्टम साठी नेण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद मध्ये मनाविरूद्ध मुलीने लग्न केले म्हणून मुलीच्या आई आणि भावाने देखील एकीचा खून केला होता. त्यामध्येही मुंडकं छाटण्यात आलं होतंं तसेच भावाने छाटलेल्या मुंडक्यासह सेल्फी देखील घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement