सार्वजनिक ग्रंथालयांच्या देय थकित अनुदानासाठी 30 कोटी 93 लाख रुपयाचा निधी मंजूर; उदय सामंत यांची माहिती

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सन 2019-20 या आर्थिक वर्षातील देय थकित अनुदानासाठी 30 कोटी 93 लाख, 75 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती राज्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे.

Uday Samant | (File Photo)

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सन 2019-20 या आर्थिक वर्षातील देय थकित अनुदानासाठी 30 कोटी 93 लाख, 75 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती राज्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे.

दरम्यान, यासंदर्भात अधिक माहिती देताना उदय सामंत यांनी सांगितले की, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास वितरित व खर्च करण्यास ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय यांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच सन 2020-21 या आर्थिक वर्षात कला व संस्कृती, सार्वजनिक ग्रंथालये, मध्यवर्ती, जिल्हा व तालुका ग्रंथालय यांना सहाय्यक अनुदानासाठी 123 कोटी 75 लाख रुपये एवढा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असल्याचेदेखील सामंत यांनी सांगितले आहे. (हेही वाचा - Pune-Nashik Railway Project: पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणार - अजित पवार)

सार्वजनिक ग्रंथालयांना मागील वर्षाचे थकित अनुदान 32 कोटी रूपये देण्यासंदर्भात उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी कृती समितीची दिनांक 12 जुलै 2020 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वित्त मंत्री यांच्याशी चर्चा करून अनुदान वितरित करण्याबाबत सामंत यांनी विनंती केली होती. वित्त विभागाने मंजूर तरतुदीच्या 25 % म्हणजे 30.93 कोटी अनुदान वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2020 रोजी जारी करण्यात आला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement