Coronavirus: अहमदनगर मध्ये मुंबईहून आलेल्या 3 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 75 वर पोहोचली
त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 75 वर पोहोचली आहे. यासंदर्भात अहमदनगरचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी माहिती दिली आहे.
Coronavirus: अहमदनगर (Ahmednagar) मध्ये मुंबईहून (MUmbai) आलेल्या 3 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 75 वर पोहोचली आहे. यासंदर्भात अहमदनगरचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी माहिती दिली आहे.
अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड 19 चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रयोगशाळांमध्ये रुग्णांचे स्लॅब तपासणी करण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात मुंबई-पुण्याहून येणाऱ्या लोकांचा समावेश आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नगर शहराच्या मध्यवस्तीतील काही भाग कन्टेन्मेंट झोन आणि बफर झोन घोषित करण्यात आला आहे. या भागात येत्या 4 जूनपर्यंत निर्बंध लागू राहणार आहेत. (हेही वाचा - Coronavirus: भारतात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 1,51,767 वर पोहोचली, 83004 रुग्णांवर उपचार सुरु, 64425 जणांना डिस्चार्ज)
महाराष्ट्रात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात मंगळवारी 2 हजार 91 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. तर दिवसभरात 97 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 54 हजार 758 वर पोहोचली आहे.
याशिवाय भारतात कोरोना विषाणुने संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या 1,51,767 इतकी झाली आहे. यात 83004 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 64425 जणांचा आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत 4337 कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे.