Mumbai News: 7.43 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी 28 वर्षीय तरुणाला अटक, बोरिवली पोलिसांकडून कारवाई

४६ लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी २८ वर्षीय तरुणाला अटक केले आहे.

Online Fraud | (Photo credit: archived, edited, representative image)

Mumbai News: तब्बल 7.43 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी 28 वर्षीय तरुणाला अटक केले आहे. ऑनलाईन कामे पूर्ण केल्यावर चांगला परतावा देण्याचे आश्वासन देत त्यांने सात ते आठ लोकांची फसवणूक केली आहे. बोरिवली पोलिस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहे. मोहम्मद जलाल असं पैशांची फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याने जीबीएल डिजिटल मार्केटिंगचा एचआर असल्याचे सांगून लोकांकडून पैशांची फसवणूक केली. ( हेही वाचा- मित्राची 52 लाखांची फसवणूक, व्यावसायिकेवर आझाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी फसवणूकीच्या पैशाने मालवणी आणि मालाड येथील दोन दागिन्यांच्या दुकानातून सोने खरेजी केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांना दागिन्यांच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपीचे कॉल रेकॉर्डिंगचा आढावा घेतला. आरोपी मालाड पश्चिम येथील मालवणी येथील मानसरोवर इमारतीती असल्याचे समोर आले आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले आहे. 5 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आले आहे. बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिकारी कल्याण पाटील यांनी ही कारवाई केली. दिवसेंदिवस ऑनलाईन पैशांची फसवणूक होत असल्याने नागरिकांनी सुरक्षतेचा प्रश्न उभा केला आहे.