हिमाचल प्रदेश: कुल्लू मधील रायला गावात तीन मजली घराला लागली भीषण आग ; 24 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

शेतकरी आंदोलन, राजकारण, समाज, संस्कृती, क्रीडा, विज्ञाण, कोरोना व्हायरस, कोरोना लस यांसर स्थानिक, प्रादेशीक आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटना, घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी सोबत जोडलेले राहा.

25 Feb, 05:18 (IST)

हिमाचल प्रदेशच्या कुल्लू मधील रायला गावात तीन मजली घराला भीषण आग लागली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

25 Feb, 04:52 (IST)

तामिळनाडू: मदुराईमधील 3 इलेक्ट्रॉनिक दुकानांना आग लागल्याची माहिती मिळत आहे. अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे.

25 Feb, 04:39 (IST)

राजस्थान: आज जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 17,97,400 रुपये किंमतीचे स्मार्टफोन आणि मोबाईल उपकरणे आणि अंदाजे 17,400 रुपये किंमतीची विदेशी चलन आणि 4,400 रुपयांचे भारतीय चलन जप्त केले.

25 Feb, 03:56 (IST)

गेल्या 24 तासांत दिल्लीत 200 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून, 115 रुग्ण बरे झाले आहेत. आज शहरात 2 मृत्यूची नोंद झाली आहे. दिल्लीमधील एकूण रुग्णसंख्या 6,38,373 झाली असून, आतापर्यंत 6,26,331 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या इथे 1137 सक्रीय रुग्ण आहेत.

25 Feb, 02:48 (IST)

केरळच्या त्रिशूर येथील गुरुवायूर मंदिरात गुरुवायूर मंदिर उत्सव सुरू होण्याच्या निमित्ताने आज गुरुवारी हत्तींच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.

25 Feb, 02:29 (IST)

मध्य प्रदेशात महिलेने कोरोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतर मृत्यू झाला आहे.

25 Feb, 02:19 (IST)

BKU चे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पिंजऱ्यातील पोपट म्हणून संबोधले आहे.

25 Feb, 02:04 (IST)

सोनापूर परिसरात नक्षलवाद्यांकडून घडवून आणण्यात आलेल्या बॉम्ब स्फोटात ITBP जवानाचा मृत्यू तर गोळीबारात DRG जवान जखमी झाला आहे.

25 Feb, 01:50 (IST)

सोलापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली आहे.

25 Feb, 01:28 (IST)

दिल्लीत नर्सरी ते इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना  पुढील शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी प्रमोट केले जाणार आहे.

25 Feb, 01:19 (IST)

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 8870 रुग्ण आढळले असून 80 जणांचा गेल्या 24 तासात बळी गेला असून राज्यातील कोविड19 चा आकडा 21,21,119 वर पोहचला आहे.

25 Feb, 01:08 (IST)

आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 1 कोटी 23 लाख 66 हजार 633 आरोग्य सेवेतील कामगारांना कोरोना लस देण्यात आली.

25 Feb, 01:04 (IST)

देशात आतापर्यंत 1,23,66,633 हेल्थवर्कर्स आणि 2,63,224 फ्रंटलाईन वर्कर्सला कोरोनाची लस दिल्याची आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

25 Feb, 24:47 (IST)

दिल्लीत 8 वी च्या इयत्तेचा परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार नाहीत.

25 Feb, 24:37 (IST)

हरियाणा मध्ये पहिली आणि दुसरीचे वर्ग येत्या 1 मार्च पासून सुरु करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.

25 Feb, 24:26 (IST)

उत्तराखंड मध्ये झालेल्या पुर परस्थिती प्रकरणी 70 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अद्याप 29 जण बेपत्ता असल्याची  पोलिसांनी माहिती दिली आहे.

25 Feb, 24:07 (IST)

प्रसिद्ध व्हिडिओ शेअरिंग अॅप TikTok कडून US मधील तब्बल 340,000 व्हिडिओ काढण्यात आल्या असून त्यात नियमांचे उल्लंघन केल्याने  हा निर्णय घेतला गेला आहे.

24 Feb, 23:42 (IST)

मी राजकरणात आहे म्हणून  माझा राग केला जातो अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर केली आहे.

24 Feb, 23:26 (IST)

देशातील सरकार हे Moneties आणि Modernise च्या मंत्रानुसार पुढे वाटचाल करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

24 Feb, 23:13 (IST)

शेअर मार्केटमध्ये सेनसेक्स 1030 वर पोहचला तर निफ्टी 14,900 वर स्थिरावला आहे.

Read more


राज्यात कमी झालेला कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका पुन्हा एकदा वाढत असल्याचे चित्र आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात महाराष्ट्रात कोरोनाचे 6,218 नवे रुग्ण आढळून आले. अनेक उपाय योजना करुनही राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढते आहे, ही मोठी चिंतेची बाब मानली जात आहे. प्रामुख्याने पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती यांसारख्या शहरांमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांनाही कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. यापुढे मंत्रालयाचे कामकाज दोन पाळ्यांमध्ये चालणार आहे. तसेच, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करुन कामाचा निपटारा करता येईल याचीही चाचपणी सुरु आहे. ज्या विभागांना वर्क फ्रॉम होम करता येऊ शकते त्यांना ही सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत.

कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महापालिकांना सुसज्जतेचे आदेश दिले आहेत. प्रामुख्याने हे आदेश मुंबई महापालिकेला देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व आयुक्तांसोबत बैठक घेऊन आढावाही घेतला.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर वनमंत्री संजय राठोड हे प्रदीर्घ काळ गायब होते. त्यानंतर काल (23 फेब्रुवारी) ते अचानक पोहरादेवी येथे दाखल झाले. या वेळी त्यांच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी उसळली. वनमंत्री संजय राठोड यांनी केलेले हे एकप्रकारचे शक्तीप्रदर्शनच होते. मात्र, राज्यात कोरोना व्हायरस संसर्गाची स्थिती असल्यामुळे गर्दी टाळण्याचे अवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले होते. राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनामुळे एक प्रकारे या अवाहनालाच हरताळ फासला गेला, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे राठोड यांच्यावर आता काय कारवाई होणार याबाबत उत्सुकता आहे.

शेतकरी आंदोलन, राजकारण, समाज, संस्कृती, क्रीडा, विज्ञाण, कोरोना व्हायरस, कोरोना लस यांसर स्थानिक, प्रादेशीक आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटना, घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी सोबत जोडलेले राहा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now