Gold Rate: 'अक्षय्य तृतीया' चा मुहूर्त साधत सोनं खरेदी करताय? पहा आज मुंबई, पुणे, नाशिक मध्ये सोन्याचा भाव काय
30 एप्रिलच्या तुलनेत आज सोन्याच्या बाजारात दर सुमारे 150 रूपयांनी कमी झाला आहे.
सध्या लग्नसराई आणि येत्या 7 मे दिवशी येणारा साडेतीन मुहूर्तापैकी एक येणारा अक्षय्य तृतीयेचा (Akshay Tritiya) दिवस यामुळे सोने खरेदीचं प्रमाण या आठ्वड्यात वाढण्याची शक्यता आहे. अक्षय्य तृतीयेदिवशी काही जण हौस म्हणून तर काही जण केवळ गुंतवणूकीचा भाग म्हणून सोनं खरेदी करतत. वळं, सोन्याचं कॉईन, बिस्किट किंवा एखादा दागिना म्हणून सोनं खरेदी केलं जातं. मग पहा महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर या भागात आजचा सोन्याचा नेमका दर काय? (Akshaya Tritiya 2019: जाणून घ्या काय आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयेचे महत्व; पूजा आणि सोने खरेदीचा शुभ मुहूर्त)
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
शहर |
22 कॅरेट (10 ग्रॅम) |
24 कॅरेट (10 ग्रॅम) |
मुंबई | 31250 | 32250 |
पुणे | 31250 | 32250 |
नाशिक | 31250 | 32250 |
नागपूर | 31250 | 32350 |
30 एप्रिलच्या तुलनेत आज सोन्याच्या बाजारात दर सुमारे 150 रूपयांनी कमी झाला आहे. मात्र हा केवळ बाजारभाव आहे. तुमच्या दागिन्यानुसार त्यावर घडणावळ आणि टॅक्स यांची आकारणी करून एकूण भाव वधारण्याची शक्यता असते.