दिलासादायक! धारावीत आज केवळ 2 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 हजार 545 वर पोहोचली
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मुंबई शहरात आढळून येत आहे. मात्र, आज मुंबई शहरातील कोरोना व्हायरस रुग्णांच्या दुप्पटीचा वेग आता 72 दिवसांवर पोहोचला आहे. याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतलेल्या धारावी आज केवळ 2 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.
राज्यात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग वाढत असताना एक दिलासादायक बातमी हाती आली आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मुंबई शहरात आढळून येत आहे. मात्र, आज मुंबई शहरातील कोरोना व्हायरस रुग्णांच्या दुप्पटीचा वेग आता 72 दिवसांवर पोहोचला आहे. याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतलेल्या धारावी आज केवळ 2 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.
मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत गेल्यानंतर धारावी, वरळी, दादर याठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून धारावीत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. आज नव्याने दोन जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने धारावीतील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 2,545 इतकी झाली आहे. (हेही वाचा - ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळणार 500 नवीन रुग्णवाहिका; राजेश टोपे यांची माहिती)
सध्या धारावीतील 83 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे. दरम्यान, आज मुंबईत दिवसभरात 1104 नवे कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण आढळून आले. मंगळवारी धारावीतील 3 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. धारावीतील एकूण कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा विचार करता राज्यात धारावी मॉडेल यशस्वी ठरताना दिसत आहे.