Palghar: पालघरमध्ये मोटारसायकल आणि कारच्या धडकेत 2 ठार

बोईसर महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमआयडीसी) परिसरातील पालगावजवळ रविवारी सायंकाळी 7.30 वाजता हा अपघात झाला, असे पोलीस नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.

Accident (PC- File Photo)

Palghar: पालघर जिल्ह्यात कामावरुन घरी परतणाऱ्या दोन जणांचा मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन मृत्यू झाला. यासंदर्भात पोलिसांनी सोमवारी माहिती दिली. बोईसर महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (Boisar Maharashtra Industrial Development Corporation एमआयडीसी) परिसरातील पालगावजवळ रविवारी सायंकाळी 7.30 वाजता हा अपघात (Accident) झाला, असे पोलीस नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.

नरेंद्र चिंतामण बारी (वय, 42) आणि रुपेश बारी (वय, 40) हे मृतक एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला होते. ते घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला कारची धडक बसली, असे अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा -Pune Accident: कोंढव्यात व्हॅनिटी व्हॅनचे ब्रेक निकामी होऊन भीषण अपघात, 2 जणांचा मृत्यू आणि 5 जण जखमी)

मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. कार चालकाला ताब्यात घेण्यात आले असून भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा - Mumbai MHADA 2023 Lottery: मुंबई मध्ये म्हाडा च्या 4083 घरांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू; mhada.gov.in वर करा अर्ज)

कार चालक दारूच्या नशेत होता की नाही हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेनंतर नांदगाव येथील रहिवासी रुग्णालयाजवळ जमा झाले आणि त्यांनी दोघांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्यक्तीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली.