Coronavirus: मुंबईमध्ये नवीन 183 कोरोना बाधित रुग्णांची नोंद; शहरातील एकूण संक्रमितांची संख्या 1936 वर
महाराष्ट्र सरकार याबाबत उपाययोजना करीत आहे मात्र तरी कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) बाबत महाराष्ट्राचा (Maharashtra) मृत्युदर हा जगात सर्वाधिक असल्याची बातमी आली होती. महाराष्ट्र सरकार याबाबत उपाययोजना करीत आहे मात्र तरी कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आता बीएमसीने (BMC) दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईमध्ये 183 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह केसेस आणि 2 मृत्यूची नोंद झाली आहे. अशाप्रकारे मुंबईतील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1936 आणि मृत्यू 113 झाले आहेत. आतापर्यंत 181 रुग्णांना सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात कोरोना व्हायरसचे संशयित म्हणून शहरातील अडीचशे जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज दुपारपर्यंत राज्यात नव्या 117 रुग्णांची नोंद झाली होती. यातील 66 रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत. तर उर्वरीत 44 रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहेत. राज्यातील एकूण कोरोना व्हायरस बाधीत रुग्णांची संख्या 2801 इतकी झाली आहे.आता नुकतेच पुण्यात 49 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला असून, हा पुण्यातील आजचा 5 वा मृत्यू आहे. सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉक डाऊन चालू आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुविधाच सुरु असणार आहेत. (हेही वाचा: भारतातील 170 जिल्हे हॉटस्पॉट म्हणून घोषित; तीन विभागांत जिल्ह्यांची विभागणी)
अशा वस्तूंच्या वाहतुकीदरम्यान पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून कामगारांना अडवणूक होऊ नये यासाठी, पोलिस विभागाशी समन्वय साधण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (दक्षता) सुनिल भारव्दाज यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान भारताबद्दल बोलायचे झाले तर, देशात गेल्या 24 तासांमध्ये 1,118 नवीन प्रकरणे समोर आली आहेत व अशाप्रकारे भारतातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 11,933 वर पोहचली आहे. बुधवारी 77 लोकांचा मृत्यू झाला असून या विषाणूमुळे देशातील एकूण मृत्यूंची संख्या 392 झाली आहे.