नवी मुंबईत भाजपला धक्का बसणार, राजीनामा दिलेले 4 नगरसेवक शिवसेनेत जाण्याची शक्यता; 17 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

मुंबई सह महाराष्ट्रा आणि देशा-परदेशातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज अवघ्या एका क्लिकमध्ये जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठीला नक्की भेट द्या.

18 Feb, 05:10 (IST)

नवी मुंबईत भाजपला धक्का बसणार असून राजीनामा दिलेले 4 नगरसेवक शिवसेनेत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

18 Feb, 04:20 (IST)

पुणे विमानतळावर महिला प्रवाशाकडून 20 लाखांचे सोने जप्त करण्यात आले आहे. 

18 Feb, 03:20 (IST)

कोलकाता येथे देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो सेवा लवकरत सुरु होणार  आहे. 

18 Feb, 02:38 (IST)

 

मुंबईच्या काही भागात म्हणजेच कुर्ला, मानखुर्दसह यासह अन्य ठिकाणी आज रात्री 12 वाजल्यापासून 15 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

18 Feb, 02:04 (IST)

भामरागड येथे गडचिरोली पोलीस दलातील कमांडो पथकाने बेधडक कारवाई करून एका नक्षलवाद्याला कंठस्नान घातल्याचे समजत आहे. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील अबुजमाड जंगलात ही कारवाई झाली असून. सुरुवातीला नक्षलवाद्यांनी कमांडो पथकावर गोळीबार करताच कमांडोंनी केलेल्या कारवाईत एका नक्षलवाद्याला ठार करण्यात आले आहे. सोबतच ३०० अन्य नक्षलवादी पळून गेल्याची माहिती देखील समोर येत आहे.

18 Feb, 01:15 (IST)

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या माहितीनुसार, येत्या 24 फेब्रुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे थेट वॉशिंग्टन वरून अहमदाबाद ला येतील मोटेरा स्टेडियम मध्ये ट्राम यांच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाला तब्बल 1 लाख लोक उपस्थित राहणार आहेत.

18 Feb, 24:41 (IST)

जीएसटी भवनाला आज लागलेल्या आगी वरून भाजप नेते प्रवीण छेडा यांनी संशय घेत, या आगीत कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का असा सवाल केला आहे, या भवनात महसूल संबंधित महत्वाची कागदपत्रे असतात, घोटाळे लपवण्यासाठी ही आग मुद्दाम तर लावलेली नाही ना असेही छेडा यांनी म्हंटले आहे. 

18 Feb, 24:34 (IST)

शिवाजीचे उद्दातीकरण; पडद्यामागेचे वास्तव या पुस्तकावरून आता नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे, या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह्य विधाने केल्याचे म्हणत भाजप नेते शिवराय कुलकर्णी यांनी या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. 

 

18 Feb, 24:03 (IST)

पाकिस्तान मधील क्वेटा येथे झालेल्या ब्लास्ट मध्ये ५ जण ठार तर अनेकजण जखमी झाल्याचे समजत आहे.

17 Feb, 23:51 (IST)

 'सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,' हे वक्तव्य करणाऱ्या प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली आहे. यासंबंधी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. दुसरीकडे हा इंदुरीकर महाराजांना नाहक त्रास देऊन नका अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा वारकरी संप्रदायाकडून देण्यात आला आहे. 

 

17 Feb, 23:22 (IST)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आज पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना सूचना देत “सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे, मुख्यमंत्र्यांशी योग्य समन्वय ठेवा. वादग्रस्त वक्तव्ये टाळा”,असे म्हंटले आहे. याशिवाय  अन्य काही मुद्द्यांवर सुद्धा या बैठकीत चर्चा झाली, याच वेळी जीएसटी भवनाला आग लागल्याने अजित पवार यांना पाहणीसाठी जावे लागले त्यामुळे ते बैठकीला अनुपस्थित होते.

17 Feb, 22:02 (IST)

आशा देवी या पीडेतेच्या आईने कोर्टाकडून जारी करण्यात आलेल्या 3 र्‍या डेथ वॉरेंटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेक प्रयत्नांनंतर फाशीच्या शिक्षेसाठी तिसर्‍यांदा डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. दरम्यान आता 3 मार्चला तरी चारही दोषींना फाशी होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

17 Feb, 21:48 (IST)

निर्भया बलात्कार प्रकरणी चारही दोषींना फाशी देण्यासाठी नवे डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. 3 मार्च दिवशी सकाळी 6 वाजता सार्‍यांना   फाशी देण्यात येणार आहे.

17 Feb, 21:44 (IST)

आज दुपारी माझगाव परिसरात असलेल्या GST  भवन इमारतीला लागलेली आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. दरम्यान या इमारतीमधील सार्‍या कर्मचार्‍यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.  इथे वाचा सविस्तर वृत्त 

17 Feb, 21:37 (IST)

हार्बर मार्गावरून  सीएसटीएम च्या दिशेने येणार्‍या मुंबई लोकल 20 मिनिटं उशिराने धावत आहेत.  

17 Feb, 20:54 (IST)

पाचगणी येथील रहिवासी शाळेच्या हॉस्टेल मधील 11 आदिवासी विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करण्याच्या आरोपा वरून  2 शिपायांना अटक करण्यात आली आहे. वयवर्षे 10 ते 13 मधील 11 आदिवासी विद्यार्थ्यांवर हे शिपाई अत्याचार करत होते. शनिवारी स्थानिक न्यायालयाकडून त्यांना 5 दिवसांची कोठडी सुनवण्यात आली आहे.

17 Feb, 20:47 (IST)

माझगाव मधील जीएसटी भवनात लागलेल्या भीषण आगीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दोन तासांपासून घटनास्थळी उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी माध्यमंही संवाद साधताना या घटनेचा तपास होणार असे सांगितले. ही आग कागद पत्रे आणि लाकूडामुळे ही आग जास्त भडकल्याचा प्राथमिक अंदाज देखील पवार यांनी वर्तवला आहे. 

 

17 Feb, 20:34 (IST)

माझगाव मधील जीएसटी भवनात लागलेल्या भीषण आगीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दोन तासांपासून घटनास्थळी उपस्थित आहेत.

17 Feb, 19:52 (IST)

आज दुपारी स्पार्क  होऊन जीएसटी बिल्डिंगला लागलेली आग काही वेळापूर्वी आटोक्यात आली असे वृत्त देण्यात आले होते. मात्र पुन्हा 9व्या मजल्यावर आग धगधगायला सुरूवात झाली आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील मोक्याच्या स्थळी उपस्थित आहेत. हायड्रॉलिक शिडीच्या माध्यमातून आता आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.  

17 Feb, 19:14 (IST)

नवाब मालिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमा कोरेगाव तपास प्रकरणी राज्य सरकार समांतर SIT चौकशी करणार आहेत. तर लवकरच गृहमंत्री त्याबाबत निर्णय घेणार आहेत.

Read more


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (17 फेब्रुवारी) आणि उद्या दोन दिवसांच्या कोकण दौर्‍यावर आहेत. दरम्यान या कोकण दौर्‍यामध्ये उद्धव ठाकरे रत्नागिरी मधील नाणार रिफायनरी प्रकल्पासोबतच महत्त्वाच्या विकासप्रकल्पांचा आढावा घेणार आहेत. रायगड,रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यांना ते भेट देणार आहेत. दरम्यान नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला होता. शिवसेनेही त्यांना पाठिंबा देत प्रकल्पाविरोधी भूमिका घेतली होती. मात्र आता पुढील विकासप्रकल्पासाठी आज मुख्यमंत्री स्थानिकांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. आज दुपारी 12च्या सुमारास उद्धव ठाकरे गणपतीपुळे पर्यटन विकासासाठी मंजूर झालेल्या 102 कोटींच्या विकास कामांना मंजुरी मिळालेल्या प्रमुख विकासकामांचे भूमीपूजन करणार आहेत. दरम्यान त्यानंतर आज दक्षिणेतील काशी समजली जाणार्‍या आंगणेवाडी जत्रेला नेते आणि पदाधिकार्‍यांसोबत जाऊन भराडी देवीचं दर्शन घेणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी मात्र टीकास्त्र डागलं आहे. उद्धव ठाकरे यांचा हा दौरा पर्यटन दौरा असल्याचं म्हणत त्यांनी खिल्ली उडवली आहे. या दौर्‍यादरम्यान कोकणवासीयांना काहीच मिळणार नसल्याचं भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले आहेत. अद्याप अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे तुमचं सरकार तुम्ही चालवा; कोकणी जनतेला शांतपणे जगू द्या असेही त्यांनी म्हटलं आहे.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

महाविकास आघाडीमध्ये मागील काही दिवसांपासून अंतर्गत मतभेद समोर येत आहेत. आज एनसीपी अध्याक्ष शरद पवार यांनी नाशिक दौरा अर्धवट सोडून 16 मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे आज एकीकडे उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा असताना दुसरीकडे शरद पवार यांच्या बैठकीकडेही महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now