Coronavirus: पुण्यात आज दिवसभरात 135 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर; जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2380 वर पोहोचली
Coronavirus: पुण्यात आज दिवसभरात 135 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2380 वर पोहोचली आहे. आज पुण्यात नोंद करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये नायडू-महापालिका रुग्णालयात 107, खासगी रुग्णालयात 23 आणि ससून रुग्णालयात 5 जणांचा समावेश आहे. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे.
Coronavirus: पुण्यात (Pune) आज दिवसभरात 135 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2380 वर पोहोचली आहे. आज पुण्यात नोंद करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये नायडू-महापालिका रुग्णालयात 107, खासगी रुग्णालयात 23 आणि ससून रुग्णालयात 5 जणांचा समावेश आहे. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे.
दरम्यान, पुणे शहरात आज 1 हजार 543 व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत पुण्यात एकूण संख्या 21 हजार 813 कोरोना चाचणी झाल्या आहेत. यात आतापर्यंत 2 हजार 380 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्या आहेत. याशिवाय पुण्यात आतापर्यंत 826 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या 1 हजार 414 रुग्णांवर उपचार सुरु असून 140 कोरोना रुग्ण दगावले आहेत. (हेही वाचा - Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांनी पार केला 20 हजारांचा टप्पा; राज्यात आज 1165 नव्या कोरोना रुग्णांची भर तर 48 जणांचा कोरोनामुळे मृत्यू)
आज दिवसभरात 96 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 826 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यात नायडू-महापालिका रुग्णालयातील 74, खाजगी रुग्णालय 12 आणि ससूनमधील 10 रुग्णांचा समावेश आहे. पुणे शहरातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या सध्या 826 झाली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)