Wedding Special Ukhane For Bride: नव्या नवरीने घ्यायचे 'हे' हटके उखाणे लग्न सोहळ्यातील विधींसाठी आहेत बेस्ट पर्याय

यंदाच्या लगीनसराईच्या निमित्ताने आम्ही घेऊन आलो आहोत काही खास हटके उखाण्यांचे नमुने ज्यांचा वापर करून तुम्ही लग्नातली विविध विधी तसेच गृह्प्रवेशाच्या वेळी सुद्धा आपली छाप पाडू शकता.

Maharashtrian Wedding (Photo Credits: Instagram)

उखाणा  (Ukhana) हा मराठी लग्नातील (Maharashtrian Wedding) एक अविभाज्य घटक आहे.  लग्नात, नवरा नवरीला प्रत्येक विधीत घरातील हौशी मंडळी उखाणे घेण्याचा आग्रह करत असतात. अर्थात तुम्हीही आजवर अनेकांकडे हा उखाण्यांचा हट्ट केला असेल. पण जेव्हा स्वतःवर ही वेळ येते तेव्हा नेमके ऐन वेळी काही न आठवल्याने पंचाईत होते. पण काळजी करू नका आम्ही तुमची पंचाईत होऊ देणार नाही.  यंदाच्या लगीनसराईच्या निमित्ताने आम्ही घेऊन आलो आहोत काही खास हटके उखाण्यांचे नमुने ज्यांचा वापर करून तुम्ही लग्नातली विविध विधी तसेच गृह्प्रवेशाच्या वेळी सुद्धा आपली छाप पाडू शकता. Winter Wedding Fashion Tips: थंडीच्या सीझन मधील लग्नासाठी Warm & Stylish लूक साकारायला मदत करतील 'या' फॅशन टिप्स

पूर्वीच्या काळी अनेक महिला भला मोठा उखाणा घेत आपल्या श्रोते मंडळींची आतुरता ताणून ठेवायच्या आणि मग अखेरीस आपल्या पतिराजांची नाव घेऊन या उखाण्याची पुरतात व्हायची अर्थात  मोठाले  उखाणे तुमच्या लक्षात रहाणार नसतील तर अगदी मोजक्या शब्दात पण सुंदर पद्धतीने देखील उखाणा घेता येईल.

1)पतिव्रतेचे व्रत घेऊन सर्वांशी प्रेमाने वागेन

.. रावांचे नाव घेताना तुम्हा सर्वांचे आशीर्वादच मागेन

2)ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,

… रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल

3)कृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन,

… रावां सोबत जगताना आदर्श संसार करीन.

4)शुभमंगल झाले अक्षदा पडल्या माथी

.. राव आता मी तुमची सात जन्मासाठी

5)अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी,

आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे..रावांची राणी.

6) नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार,

... राव मला आवडतात फार

7) गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी,

…रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.

गृह्प्रवेशाला घ्यायचे उखाणे

1)स्वर्गीय नंदनवनात सोन्याच्या केळी

.. रावांचे नाव घेते गृह्प्रवेशाच्या वेळी

2)तिन्ही लोकात श्रेष्ठ ब्रम्ह, विष्णू, महेश

.. रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश

3)घरी टाकले पाऊल नववधू बनून

सर्वांच्या भीतीने जीव गेला बावरुन,

…रावांची साथ आणि सासरच्यांचा पाठिंबा पाहून

भीती.. छे केव्हाच गेली पळून!

4)1.. 2... 3... .. रावांचं नाव घेते करा मला फ्री

मोठे उखाणे

1)हंड्यावर हंडे सात

त्यावर ठेवली परात

परातीत होते सातू

सातूचा केला भात

भातावर वरण, वरणावर तुपाची धार

तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा

जोड्यात हलगडी, हलगाडीत बलगडी

बलगडीत पिंजरा, पिंजर्यात रघु

राघूच्या तोंडी उंबर... रावांचं नाव ऐकलंत ना, मग काढा रुपये शंभर..

2)सासरचा गाव चांगला

गावामध्ये बंगला

बंगल्याला खिडकी, खिडकीत द्रोण

द्रोणात तूप, तुपासारखं रूप

रूपासारखा जोडा, चंद्रभागेला पडला वेढा

चंद्रभागेची पाच नाव, नावेत बसावं

आणि.. रावांनी देहू, आळंदी, पंढरपूर फिरवावं

आपण पाहिलात की या उखाणे घेण्याच्या रूपात कुठे सासरच्या मंडळींचे कौतुक करत तर कुठे नकळत पतिराजांकडे हट्ट करत आपली मागणी मांडण्याचा पर्याय असतो, ही संधी हेराहायला विसरू नका. या सर्व रीती परंपरा या तुमच्या आनंदासाठी आहेत त्यामुळे सर्वात महत्वाचे म्हणजे आनंद उपभोगत आपला लग्नसोहळा फुल्ल ऑन एन्जॉय करा.. आणि हो तुम्ही काही वेगळा उखाणा घेणार असाल तर आम्हालाही कळवा..



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif