Vastu Tips for Money Plant: कोणत्या दिशेला मनी प्लांटचे झाड लावावे? जेणेकरुन घरात येईल सुख-समृद्धी

मात्र तुम्हाला माहिती आहे का, मनी प्लांटच्या झाडाला वास्तूशास्त्रात फार मोठे महत्व आहे.

Money Plant (Photo Credits-Facebook)

Vastu Tips for Money Plant:  आपण घरात किंवा ऑफिसमध्ये मनी प्लांटचे झाड हे एक शो म्हणून लावतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का, मनी प्लांटच्या झाडाला वास्तूशास्त्रात फार मोठे महत्व आहे. मनी प्लांट हे नावानुसार घरात धन, संपत्ती आणि समृद्धी घेऊन येते. परंतु हे झाड योग्य दिशा आणि स्थितिनुसार लावणे हे वास्तूच्या दृष्टीकोनाने फार जरुरी आहे. नाहीतर तुमच्यावर त्याचा नकारात्मक प्रभाव ही पडू शकतो. आम्ही आज तुम्हाला मनी प्लांट बद्दल अशा काही टीप्स सांगणार आहोत जेणेकरुन तुमच्या घरात सुख-समृद्धी नेहमीच खेळत राहिल.

तर वास्तूनुसार, मनी प्लांटचे झाड नेहमीच घर किंवा ऑफिसच्या आग्नेय दिशेला म्हणजेच दक्षिण पूर्व दिशेला लावावे. या दिशेला मनी प्लांटचे झाड लावल्यास ते तुमच्यासाठी लाभदायक मानले जाते. तसेच यामुळे धन-संपत्ती मध्ये वाढ होते. घरात सकारात्मक उर्जा निर्माण होऊन व्यापार आणि नोकरीत सुद्धा प्रगती होते. आग्नेय दिशेचा प्रतिनिधी शुक्र ग्रह आहे. याच कारणामुळे या दिशेला मनी प्लांट लावल्याने शुक्र ग्रहाचा सकारात्मक प्रादुर्भावात वाढ होते. शुक्र ग्रह व्यक्तिच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन येते.(Health Tips : रात्री जेवल्यानंतर लगेचच 'ही' फळे चुकूनही खाऊ नका, अन्यथा होऊ शकतात दुष्परिणाम)

मनी प्लांट कधीच ईशान्य दिशेला लावू नये. यामुळे तुमच्यावर त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात. घरात पैशांबद्दल समस्या निर्माण होऊ शकते. त्याचसोबत व्यापारात सुद्धा घट होण्याची शक्यता असते. या व्यतिरिक्त मनी प्लांटचे झाड नेहमीच घराच्या आतमध्येच लावावे. घराच्या बाहेर लावल्याने मनी प्लांटवर दुसरी निगेटिव्ह एनर्जीचा परिणाम होण्यास सुरुवात होते. या झाडाची फांदी नेहमीच वरील बाजूस वाढली पाहिजे. कारण यामुळे तुमच्या धन-समृद्धीमध्ये वाढ होते. पण जर फांदी खालील बाजूस वाढत असेल तर एक नकारात्मक उर्जा निर्माण करु शकते.