Varsha Mahotsav 2023: भंडारदरा आणि आंबोलीत 12 ते 16 ऑगस्ट कालावधीत ‘वर्षा महोत्सव’; घेऊ शकता पावसाळी पर्यटनाचा आनंद, जाणून घ्या आवर्जून पहावी अशी ठिकाणे

या महोत्सवात पावसाचे मंतरलेले पाच दिवस अनुभवलेच पाहिजेत. १२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या वर्षा महोत्सवामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक पार्श्वभूमी, वैभवशाली परंपरा आणि आदिवासी बांधवांचे दुर्लक्षित राहिलेले कलागुण, त्याचबरोबर खाद्य परंपरा, दुर्ग आणि किल्ले, येथील जैव विविधता पाहता येणार आहे.

Varsha Mahotsav 2023 (संग्रहित संपादित प्रतिमा)

पाऊस पडल्यानंतर पावसाची अनेकविध रुपे पाहण्यासाठी, पावसाळी पर्यटनाचा आनंद व उत्सव साजरा करण्यासाठी पर्यटन संचालनालयाच्यावतीने १२ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे ‘वर्षा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पर्यटनप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.

पर्यटन मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, पर्यटकांनी आणि पावसाच्या थेंबावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने या कार्यक्रमाला उपस्थित राहिले पाहिजे. या महोत्सवात पावसाचे मंतरलेले पाच दिवस अनुभवलेच पाहिजेत. १२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या वर्षा महोत्सवामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक पार्श्वभूमी, वैभवशाली परंपरा आणि आदिवासी बांधवांचे दुर्लक्षित राहिलेले कलागुण, त्याचबरोबर खाद्य परंपरा, दुर्ग आणि किल्ले, येथील जैव विविधता पाहता येणार आहे, तसेच अनेक गोष्टींना व्यासपीठ देणारा हा महोत्सव खऱ्या अर्थाने भंडारदरा व आंबोली पर्यटनाला चालना देणारा ठरणार आहे. पर्यटकांना निसर्गरम्य वातावरणात कोसळणाऱ्या पावसाचा आनंद घेतानाच, महाराष्ट्रातल्या कला वैभवाची पर्वणी पाहता येणार आहे.

या महोत्सवामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील आवर्जून पहावी अशी ठिकाणे अंब्रेला फॉल्स, विल्सन धरण, कळसूबाई शिखर, रंधा धबधबा, रतनवाडी गाव, अगस्त ऋषींचा आश्रम, रतनगड  किल्ला, अमृतेश्वर मंदिर, रिव्हर्स वॉटर फॉल, कोकणकडा, उंबरदरा खिंड, कुलंग खिंड, मदनगड अलंगड, पांजरेबेटे, कोलटेंभे फॉल, नेकलेस फॉल, सांदनदरी ही आहेत.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत आंबोली, माधवगड पॉईंट, तारकर्ली समुद्रकिनारा, धामापूर तलाव, शिरगावकर पॉईंट, नांगरतास धबधबा ही ठिकाणे पाहता येणार आहेत. (हेही वाचा: Monsoon Tourism: पावसाळी पर्यटन करत आहात? ही काळजी घ्या)

या ठिकाणी करू शकाल नोंदणी-

अहमदनगरच्या माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी ९५९४१५०२४३, ९९२१६६४००९ वर तर, सिंधुदुर्ग येथे नाव नोंदणीसाठी ९३७१७३९६६६, ९४२०२०७०५५ वर संपर्क साधा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now