Monsoon Trek मिस करताय? मुंबई, पुणे, रायगड लगतच्या गड किल्ल्यांचे 'हे' खास फोटो पाहून आठवणी होतील ताज्या (Photos Inside)
Monsoon Trekking: पावसाळा सुरु होताच अनेकांना भटकंतीचे वेध लागतात, पावसाच्या सरींनंतर हिरवागार झालेला डोंगर, मातीचा गंध या भटक्या मंडळींना खुणावत असतो . त्यातही निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या डोंगरदऱ्या भटकणे हे तर सुख म्हणता येईल. तुमच्यापैकीही जे लोक नियमित ट्रेकर्स आहेत त्यांना हे वेड आणि त्यातील आनंद काही वेगळा सांगायला नको. यंदा मात्र पावसाळा सुरु होऊन महिना उलटत आला तरी घरात कोंडून राहावं लागत असल्याने अनेकजण नाराज झाले असतील. कोरोनाचं (Coronavirus) संकटच इतकं भीषण आहे की कितीही इच्छा असली तरी ट्रेकिंगला जाणं यंदाच्या पावसाळ्यात शक्य होईल असे दिसत नाहीये. अशावेळी तुमच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबई (Mumbai), पुणे (Pune), रायगड (Raigad) जवळील काही प्रसिद्ध गाद किल्ल्यांचे फोटो या लेखातून शेअर करत आहोत, याच माध्यमातून यंदा आपली Wanderlust पूर्ण करून घ्या. चला तर मग..
हे ही वाचा- मुंंबई जवळचे 'हे' पाच धबधबे नेहमीच ठरतात पर्यटकांचं आकर्षण (See Photos)
विसापूर किल्ला
लोहगड
कलावंतीण गड
View this post on InstagramA post shared by Royal Vibes Trekking & Camping (@royalvibesevent.mumbai) on
रायगड किल्ला
कोरीगड ट्रेक
कोकणकडा
तोरणा किल्ला
राजमाची
काय मग? फोटो पाहून आजवर केलेल्या सर्व ट्रेक च्या आठवणी ताज्या झाल्या ना. अनेकांचे ट्रेक संबंधित अनेक किस्से फोटो असतील. हे फोटोज तुम्ही कमेंट्स बॉक्स मधून आमच्या सोबत सुद्धा शेअर करू शकता. तुमचे फोटो पाहून इतर ट्रेकर्स मंडळींना सुद्धा नवनवीन ठिकाणांची माहिती मिळण्यास मदत होईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)