Machu Picchu: फक्त एका जपानी पर्यटकासाठी Peru देशाने उघडले आपले प्रसिद्ध पर्यटन स्थळ 'माचू पिच्चू'; 6 महिने पहावी लागली वाट, जाणून घ्या कारण (See Photo)
एखाद्या देशाने फक्त एका पर्यटकासाठी आपल्या देशातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ उघडल्याचे आपण कधी वाचले आहेत? कदाचित नाही, मात्र आता पेरू (Peru) देशाने हे केले आहे.
एखाद्या देशाने फक्त एका पर्यटकासाठी आपल्या देशातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ उघडल्याचे आपण कधी वाचले आहेत? कदाचित नाही, मात्र आता पेरू (Peru) देशाने हे केले आहे. पेरूने आपले प्रसिद्ध पर्यटन स्थळ माचू पिच्चू (Machu Picchu) केवळ एका पर्यटकांसाठी उघडले आहे. या नशीबवान पर्यटकाचे नाव जेसी काटायामा (Jesse Katayama) असून तो जपानचा रहिवासी आहे. कोरोना विषाणू लॉक डाऊननंतर (Coronavirus Lockdown) पहिल्यांदाच जेसीसाठी माचू पिच्चू उघडले. याबाबत जेसीने आपल्या सोशल मिडियावर माहिती दिली आहे.
‘लॉकडाउन नंतर माचू पिच्चूला भेट देणारा पृथ्वीवरील पहिली व्यक्ती मी आहे.’ जेसीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे. तर आता सर्वांनाच प्रश्न पडला असेल की असे नक्क्की का घडले? जेसी काटायामालाच ही परवानगी का मिळाली? तर मिळालेल्या माहितीनुसार, जपानी पर्यटक जेसी काटायामाने काही दिवस पेरूमध्ये व्यतीत करण्याची योजना आखली होती. जेव्हा तो पेरूमध्ये आला तेव्हा मार्चच्या मध्यभागी कोरोना विषाणूमुळे इथे लॉक डाऊन सुरु झले. त्यानंतर तो ऑगस कॅलिएंटस (Aguas Calientes) शहरात अडकला. हे शहर माचू पिच्चूच्या जवळ आहे. (हेही वाचा: माता वैष्णो देवी भक्तांसाठी खुशखबर; नवरात्रीच्या आधी 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार दिल्ली-कटरा वंदे भारत ट्रेन, जाणून घ्या Time Table)
पेरूचे सांस्कृतिक मंत्री नेरा यांनी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले, ‘काटायामा पेरुला फक्त माचू पिच्चूला भेट देण्याचे स्वप्न घेऊन आला होता.‘ काटायामाने ज्या दिवशी या स्थळाला भेट देण्याची योजना आखली होती त्याच्या एक दिवस आधी पेरूमध्ये लॉक डाऊन सुरु झाले व त्यानंतर फक्त तीन दिवसांसाठी पेरूमध्ये आलेला जेसी गेले सहा महिने इथे आहे. अखेरीस, त्याची बातमी स्थानिक पर्यटन प्राधिकरणापर्यंत पोहोचली. त्यानंतर काटायामाला इंका शहरात जाण्यासाठी विशेष परवानगी देण्यास मान्य केले गेले.
समुद्र सपाटीपासून 7,000 फूटांपेक्षा जास्त उंचीवर अॅन्डिस पर्वतावर पर्वत असलेले माचू पिच्चू हे पेरुमधील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. माचू पिच्चू हा इन्का साम्राज्याचा सर्वात महत्वाचा वारसा आणि प्रतिक आहे, ज्याने 16 व्या शतकात स्पेनचा विजय होण्यापूर्वी 100 वर्षांपर्यंत पश्चिम दक्षिण अमेरिकेच्या मोठ्या भागात राज्य केले. सध्या इथे या साम्राज्याचे भग्न अवशेष शिल्लक आहेत. अमेरिकेच्या हिराम बिंघम यांनी 1911 मध्ये इंका सेटलमेंटचे अवशेष पुन्हा शोधून काढले आणि 1983 मध्ये युनेस्कोने माचू पिच्चूला जागतिक वारसा म्हणून घोषित केले.