Happy Women's Day: महिलांना रेल्वेमध्ये मिळतात 'हे' खास अधिकार, तुम्हीसुद्धा जाणून घ्या

त्याचसोबत तिकिटासह काही अधिकाराही दिले जातात.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Happy Women's Day: जेव्हा तुम्ही रेल्वेमधून प्रवास करता त्यावेळी फक्त रेल्वेचे तिकिट काढल्यानंतर फक्त प्रवास करण्याचा अधिकार आपल्याला मिळत नाही. त्याचसोबत तिकिटासह काही अधिकाराही दिले जातात. त्यामुळे प्रवास करताना होणाऱ्या त्रासापासून बचाव होण्याची शक्यता असते. मात्र रेल्वेतून प्रवास करताना महिलांसाठी रेल्वे प्रशासनाकडून काही खास अधिकार महिलांना देण्यात आले आहे. तर आज असणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना कोणत्या सुविधा रेल्वेमध्ये देण्यात येतात.

रेल्वमध्ये 45 वर्षावरील महिलांनी लेडिज कोटासाठी पहिले स्थान दिले जाते. त्याचसोबत या वयातील महिलांसोबत 3 वर्षापर्यंतचे मुल प्रवास करु शकते. यापूर्वी ही सुविधा फक्त स्पीपर क्लाससाठी देण्यात आली होती. मात्र आता सर्व क्लाससाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचसोबत राष्ट्रपती यांच्याकडून देण्यात येणारा पोलीस मेडल आणि इंडियन पोलीस अवॉर्ड प्राप्त झालेल्या महिलांनी भाडे खर्चात 50 टक्कांपर्यंत सूट दिली जाते. तसेच शहीद जवानाच्या पत्नीलासुद्धा भाडे खर्चात सवलत दिली जाते.(हेही वाचा-International Women’s Day 2019 निमित्त 'विस्तारा एअरलाईन्स'ची फ्री सॅनिटरी पॅड्स पुरवण्याची नवी सुविधा)

महिलांच्या सुरक्षिततेसाठी 182 हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला असून त्यावर आपल्या तक्रारीची नोंद करु शकणार आहेत. प्रत्येक पॅसेंजर ट्रेनमध्ये महिलासांठी एक बोगी आरक्षित असते. ज्यामध्ये पुरुषांना प्राधान्य दिले जात नाही. फक्त 12 वर्षाखालील मुल आणि आपल्या नातेवाईकासोबत प्रवास करता येतो. नुकताच रेल्वे अधिनियमाने संशोधनाचा प्रस्ताव दिला होता. प्रस्तावित कायद्याअंतर्गत जर एखादा व्यक्ती महिलेची छेडछाड करत असताना पकडला गेल्यास त्याला 3 वर्षाची शिक्षा देण्यात येते.