International Travel: आंतरराष्ट्रीय विमान प्रवास होणार स्वस्त? भारत सरकारचा परदेशी हवाई प्रवासाबाबत नवा करार
केंद्र सरकारकडून आंतराराष्ट्रीय प्रवासासंबंधी एक करार करण्यात आला आहे.
भारतातून (India) व्यवसाय (Business), शिक्षणासह (Education) पर्यटानासाठी (Tourism) परदेशात प्रवास (International Travel) करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच परदेशी प्रवास करण्यासाठी हवाई मार्ग हा सर्वाधिक निवडल्या जाणाऱ्या पर्यायांपैकी एक आहे. कारण अगदी कमी वेळात जगाच्या एका कोपऱ्यातू दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचायचं असल्यास हवाई मार्ग हा सर्वोत्तम पर्याय आहे. तरी भारतीयांचा हाचं आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास स्वस्त होणार असल्याची शक्यता आहे. अगदी किफायती दरात आता भारतीयांना विमान प्रवास करता येणार आहे. केंद्र सरकारकडून (Central Government) आंतराराष्ट्रीय प्रवासासंबंधी एक करार करण्यात आला आहे. त्या कराराची पार्श्वभुमी बघता भारतीयांचा आंतराष्ट्रीय प्रवास स्वस्त होण्याचे चिन्ह दिसत आहेत.
जगातील 116 देशांसोबत भारत सरकारने प्रवासासंबंधी द्विपक्षीय करार केला आहे. या करारानुसार परदेशी विमान कंपन्यांना (Foreign Airlines) भारतातील महानगरांसोबत जोडण्यासाठी भारत सरकारने परवानगी दिली आहे. ज्या 116 देशांसोबत भारताने करार केला आहे त्यांचा हवाई प्रवास स्वस्त होण्याचे चिन्ह आहेत. यामध्ये आशिया (Asia), युरोप (Europe), मध्य पूर्व (Middle East) आणि दक्षिण अमेरिकेतील (South America) देशांचा समावेश आहे. तरी सर्वसामान्य भारतीयांना परवडेल अशा दरात आता भारतीयांना 116 देशात प्रवास करता येणार आहे. तसेच परदेशी विमान प्रवासातील आसन क्षमता वाढवण्यासाठी देखील केंद्र सरकाने हा करार केलेला आहे. (हे ही वाचा:-Akasa Airlines: राकेश झुनझुनवालांची 'अकासा' आकाश प्रवासाला सज्ज, फ्लाइट तिकीट बुकींगला आजपासून सुरुवात)
या करारानुसार जर विमान प्रवासात काही बदल होणार असतील तर ते तुम्हाला पुढील काहीच दिवसात कळतील. तरी केंद्र सरकारने केलेला हा नवा करार सर्वसामान्यांसाठी किती उपयोगी ठरणार हे बघणं महत्वाचं असणार आहे. तसेच विमान तिकिटांच्या किमती फक्त अंतरावरच नाही तर वेगवेगळ्या एअरलाईन्स कंपनीनुसार देखील ठरलेल्या असतात. या कराराचा या सर्व बाबींवर काय परिणाम होणार हे लवकरच कळेल.