परदेशातील प्रवासासाठी आता मिळणार नवे लसीकरण सर्टिफिकेट, CoWin पोर्टलवर आले नवे अपडेट
कारण लॉकडाउनमुळे घरात अडकून पडलेली मंडळी आता ऑफिस, फिरण्यासाठी किंवा अन्य कामांसाठी घराबाहेर मोठ्या प्रमाणात पडत आहे.
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कारण लॉकडाउनमुळे घरात अडकून पडलेली मंडळी आता ऑफिस, फिरण्यासाठी किंवा अन्य कामांसाठी घराबाहेर मोठ्या प्रमाणात पडत आहे. अशातच कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढण्याची चिंता आहे. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.(IRCTC कडून लॉन्च होणार भारतातील पहिली Indigenous Luxury Cruise Liner;पहा त्याची खास वैशिष्ट्यं)
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन यांच्या गाइडलाइन्सनुसार, सरकारने नव्या सर्टिफिकेटची व्यवस्था सुरु केली आहे. यामध्ये तुम्ही ते डाउनलोड कसे करु शकता याबद्दल ही सांगण्यात आले आहे.(Dholavira: भारताला लाभले 40 वे जागतिक वारसा स्थळ; जाणून घ्या या हडप्पाकालीन शहराबद्दल)
-परदेशातील यात्रेसाठी कोविन पोर्टलवर नवे फिचर आले आहे
-यामध्ये पूर्णपणे लसीकरण झालेला फोटो आयडी आणि पासपोर्ट क्रमांकासह जन्म तारीख सुद्धा अपडेट करता येईल
-असे केल्यानंतर इंटरनॅशनल ट्रॅव्हलसाठी सर्टिफिकेट डाउनलोड करावे लागणार आहे
-खासियत अशी की, प्रवासासाठी दिले जाणारे सर्टिफिकेट युनिक आयडी क्रमांक मिळणार आहे
-या व्यतिरिक्त लसीकरणासह कोणती लस घेतली ते सुद्धा लिहिले जाणार आहे
>'>या' पद्धतीने डाउनलोड करा सर्टिफिकेट
-सर्वात प्रथम cowin,gov.in येथे भेट द्यावी
-आपला रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरुन लॉग-इन करावे लागेल
-पासपोर्ट क्रमांक आणि पासपोर्ट मध्ये लिहिलेली जन्मतारीख द्यावी लागेल
-सर्व माहिती दिल्यानंतर फॉर्म सबमिट करावा लागणार आहे
-पेज रिफ्रेश केल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठीचे लसीकरण सर्टिफिकेट डाउनलोड होणार आहे.
तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आता हे लसीकरण सर्टिफिकेट डाउनलोड करावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना हे लसीकरण सर्टिफिकेट घेणे आवश्यक आहे.