Chandra Grahan 2019 : चंद्रग्रहणाच्या काळात चुकुनही करू नका 'या' गोष्टी, नाहीतर भंग होईल गृहशांती
भारतीय वेळेनुसार हे चंद्रग्रहण 20 जानेवारीला सकाळी 10 वा. सुरु होणार आहे, तर 21 जानेवारी दुपारी 3.33 पर्यंत हे चंद्रग्रहण असेल. या चंद्रग्रहणाचा परिणाम बाराही राशींवर विविध प्रकारे होणार आहे.
Chandra Grahan 2019 : येत्या 21 जानेवारीला वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. या ग्रहणाला 'सुपर ब्लड वुल्फ मून' (Super Blood Wolf Moon) असे नाव देण्यात आले आहे. जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. भारतीय वेळेनुसार हे चंद्रग्रहण 20 जानेवारीला सकाळी 10 वा. सुरु होणार आहे, तर 21 जानेवारी दुपारी 3.33 पर्यंत हे चंद्रग्रहण असेल. या चंद्रग्रहणाचा परिणाम बाराही राशींवर विविध प्रकारे होणार आहे. हिंदू संस्कृतीमध्ये ग्रहणाच्या आधी असणारे सुतकाचेही महत्व असते. सूर्यग्रहणात सुतकाचा प्रभाव हा 12 तास आधी, तर चंद्रग्रहणात 9 तास आधी सुरु होतो. असे मानले जाते की, सुतकात नकारात्मक उर्जेचा संचार होतो. त्यामुळे ग्रहण हे शक्यतो अशुभ मानले जाते. मात्र यंदाचे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे या दरम्यानचे सुतक मानले जाणार नाही. तरीही अशी अनेक कामे आहेत जी चंद्रग्रहणात शक्यतो टाळावीत. शास्त्रानुसार चंद्रग्रहण काळात काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा दुर्भाग्य वाढू शकते आणि भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागते.
ग्रहणात या गोष्टी करणे टाळा -
- ग्रहण कालावधीदरम्यान मूर्तींना स्पर्श करू नये, देवाची पूजा करू नये.
- घराची साफ सफाई करू नये.
- या काळात कोणत्याही नवीन कार्यास प्रारंभ करणे अशुभ मानले जाते.
- ग्रहण कालावधीत जेवण बनवणे आणि खाणे यांस मनाई आहे.
- या काळात आंघोळ करणे टाळा.
- ग्रहण काळात तुळशीला हात लावण्यास मनाई आहे. तसेच ग्रहण सुरु होण्यापूर्वी खाण्यापिण्याच्या वस्तूंवर तुळशीपत्र ठेवावे.
- या काळात गर्भवती महिलांनी शिलाई, भरतकाम यांसारखी कामे करू नये. तसेच घराबाहेरही पडू नये. (हेही वाचा : 21 जानेवारीला वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण, जाणून घ्या वेळ आणि खास गोष्टी)
- ग्रहण कालावधी दरम्यान, जोडप्याने शारीरिक संबंध ठेवण्याची चूक करू नये.
चंद्रग्रहण संपल्यावर ही कामे करा
- ग्रहणादरम्यान, चंद्र देवतेची आराधना उपासना करावी.
- ग्रहण संपल्यावर घरात गंगाजल शिंपडावे.
- ग्रहणानंतर लगेच स्वतः स्नान करा आणि मग देवाच्या मूर्तींची यथायोग्य पूजा करा.
- ग्रहण संपल्यावर, ताजे अन्न तयार करा आणि तेच खा.
ग्रहण संपल्यावर या गोष्टी दान करा
- घरात मालमत्तेवरून विवाद चालले असतील तर, ग्रहण संपल्यावर स्नान करून तीळयुक्त मिठाई दान करावी.
- घरात आर्थिक बाबींबद्दल समस्या असतील तर रसयुक्त मिठाई दान करा.
- घरातील इतर सर्व दुःखांपासून मुक्त होण्यासाठी मुंग्या व मासे यांना ग्रहणानंतर खायला द्यावे.
- घरात बऱ्याच कालावधीपासून कोणी आजारी असेल तर, एका तुपाच्या वाटीत चांदीचा चमचा घालून त्यात आपली प्रतिमा पहा आणि ते दान करा.