Ashadi Ekadashi 2023 HD Images: आषाढी एकादशी निमित्त Wishes, WhatsApp Status, Photos शेअर करून द्या विठ्ठल- रूक्मिणी भक्तांना द्या शुभेच्छां

या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायी चालत निघालेले वारकरी पंढरपूरमध्ये पोहोचतात. चंद्रभागेच्या पात्रात स्नान करावे आणि पांडुरंगाचे दर्शन घ्यावे ही या भक्तांची इच्छा असते.

Ashadi Ekadashi | (File Imge)

जगभरातील विठ्ठलभक्त आणि वारकरी सांप्रदायातील अनेकांचे डोळे आषाढ महिन्याकडे लागलेले असतात. कारण या महिन्यात आषाढी एकादशी येते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi) असेही म्हणतात. यंदा हीच आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi 2023) म्हणजेच देवशायनी एकादशी (Devshayani Ekadashi 2023) ही 29 जुलै रोजी येते आहे. हिंदु पंचांगानुसार आषाढ शुक्ल पक्षाचा दिवस आषाढी एकादशी म्हणून ओळखला जातो. काही लोक या एकादशीला पद्म एकादशी, आषाढी एकादशी ( Ashadhi Ekadashi 2023) आणि हरिशयनी एकादशी (Harishayani Ekadashi 2023) म्हणूनही ओळखतात. हिंदु पंचांग आणि इंग्रजी दिनदर्शिका यात नेहमीच काही दिवसांचे कधी कधी एखाद्या महिन्याचेही अंतर असते. त्यामुळे आषाढी एकादशी एखाद्यावर्षी जून तर एखाद्या वर्षी जुलै महिन्यात येते. यंदाच्या वर्षी एकादशी जुलै महिन्यात आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त जर आपण एकमेकांना शुभेच्छा देऊ इच्छित असाल तर त्यासाठी Wishes, WhatsApp Staus, Messages and Facebook Photos आपण इथून डाऊनलोड करु शकता.

चांद्रमास गणनेतील फरकामुळे तिथी वृद्धी होते आणि त्यानुसार देवशयनी एकादशी, स्मार्ताची एकादशी, भागवत एकादशी येतात, असे शास्त्राचे अभ्यासक सांगतात. अधिक मास आल्यास आधिक मासाच्या आणखी दोन एकादशी येतात. अधिक महिन्यात येणार्‍या दोनही एकादश्यांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते, असाही उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. तसेच, त्यानुसार ते ते दिवस साजरेही होतात. (हे दखील वाचा: Ashadhi Ekadashi 2023 Rangoli Designs: आषाढी एकादशीनिमित्त काढा हटके रांगोळी, पाहा व्हिडीओ)

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! (File Image)
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा! (File Image)
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना विठ्ठलमय शुभेच्छा! (FIle Image)
आषाढी एकादशीच्या मंगळमय शुभेच्छा! (File Image)
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा! (File Image)
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! (File Image)

आषाढी एकादशी हा दिवस महाराष्ट्रात आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टीने मोठा महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायी चालत निघालेले वारकरी पंढरपूरमध्ये पोहोचतात. चंद्रभागेच्या पात्रात स्नान करावे आणि पांडुरंगाचे दर्शन घ्यावे ही या भक्तांची इच्छा असते. विठ्ठलाच्या भेटीसाठी शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी पंढरपूरला येते.