Sex Benefits To Body: डोकेदुखी पासुन ते कॅन्सर पर्यंत अनेक आजारांंना दुर ठेवण्यास मदत करतो सेक्स, वाचा हे भन्नाट फायदे
सेक्स आणि रिलेशनशीप एक्स्पर्ट KATE TAYLOR यांंनी सांंगितल्यानुसार ज्या व्यक्ती अधिक वेळा सेक्स करतात त्यांंच्यामध्ये कॅन्सर,हृदयाचे विकार आणि अन्य आजारांंपासुन मृत्युचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे जर का तुमचा पार्टनर फार Sex Enthusiast नसेल तर त्यांंना हे फायदे आवर्जुन वाचुन दाखवा...
Sex Benefits: रोगप्रतिकारक शक्ती कमी होतेय, स्टॅमिना नाहीये, इथपासुन ते डोकेदुखी, थकवा अशा नाही नाही त्या कारणाने आपल्या सेक्स लाईफ वर परिणाम होत असतो. बर्याचदा यामुळे कपल्स मध्ये भांंडणं सुद्धा होतात पण जसं काट्याने काटा निघतो असे म्हणतात, तसंचं या सगळ्या शारिरिक समस्यांंवर सेक्स हा एक उत्तम उपाय ठरु शकतो. हे काही आमचे नव्हे तर Washington University मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात आढळुन आलेले निरिक्षण आहे. तब्बल 15 हजार प्रतिनिधींंशी संवाद साधल्यावर अभ्यासकांंना असे दिसुन आले की, ज्या व्यक्ती अधिक वेळा सेक्स करतात त्यांंच्यामध्ये कॅन्सर,हृदयाचे विकार आणि अन्य आजारांंपासुन मृत्युचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे जर का तुमचा पार्टनर फार Sex Enthusiast नसेल तर त्यांंना हे फायदे आवर्जुन वाचुन दाखवा...
सेक्स आणि रिलेशनशीप एक्स्पर्ट KATE TAYLOR यांंनी सेक्स करण्याचे 5 फायदे सांंगितले आहेत ते खालीलप्रमाणे.. Sex During Lockdown: कोरोना काळात Masturbation हा सेक्स ड्राईव्ह पुर्ण करण्याचा बेस्ट पर्याय, कॅनडा मधील टॉप डॉक्टरांंचा सल्ला
Boosts your immunity
सध्याच्या परिस्थिती मध्ये रोगप्रतिकारक शक्ती सर्वाधिक महत्वाची आहे, अशावेळी सेक्स तुम्हाला यासाठी मदत करु शकतो. 2004 मध्ये झालेल्या एका संशोधनात असे आढळले आहे की आठवड्यातून किमान तीन वेळा सेक्स करणार्या कपल्स मध्ये रोगप्रतिकारक इम्युनोग्लोबिन ए चे प्रमाण 2 टक्के अधिक असते.
Mental Peace
सेक्स दरम्यान, आपला मेंदूत फील-गुड केमिकल्सची जणु काही पार्टी होत असते. एंडॉर्फिन्स, ऑक्सिटोसिन आणि डोपामाइन याचा आपल्या मेंदूत प्रवाह वाढतो परिणामी एकंंदरित मानसिक तणाव कमी होतो. यामुळे कपल्स ना नैराश्यातून मुक्ती होण्यास मदत होते.
Helps For Better Sleep
झोपेच्या वेळी सेक्स केल्याने आपल्या झोपेची गुणवत्ता सुधारते. पुरुषांमध्ये सेक्स नंंतर प्रोलॅक्टिन नावाच्या रसायनाच्या ऑर्गॅझमिक प्रवाहामुळे थकवा येतो पण त्यामुळे लगेचच झोप सुद्धा लागते. तर स्त्रियांमध्ये, इस्ट्रोजेन वाढल्याने लगेच झोप येते. 2016 च्या रिसर्च नुसार, निद्रानाशाचा त्रास असलेल्यांंना सेक्स केल्याने या त्रासावर कायमची मात करता येऊ शकते.
Solution Over Body Aches
अगदी डोकेदुखीपासुन ते मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास, हाडांंचे दुखणे, पाठ- कंंबर दुखी, पाय दुखी सगळ्या दुखण्यावर सेक्स हा एक कमाल उपाय ठरु शकतो. Orgasm दरम्यान एंडोर्फिनच्या प्रवाहामुळे हे शक्य होते असा अभ्यास आहे.विशेषतः मेनोपॉज मध्ये सेक्स करताना दुखत असल्यास हा दुखवा सुद्धा सेक्समुळेच कमी होतो. Sex Tips: महिलांंनो सेक्स करताना Orgasm मिळवण्यात या 7 गोष्टी ठरु शकतात अडथळा, कसा कराल उपाय?
Prevent Prostate Cancer
प्रोस्टेट कर्करोग हा 60 वर्षांहून अधिक पुरुषांसाठी सर्वात मोठा आरोग्याचा धोका आहे. यापासून दूर राहण्याचा एक नैसर्गिक मार्ग म्हणजे अधिक सेक्सअमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की जे पुरुष महिन्यातून किमान 21 वेळा सेक्स करतात त्यांंच्यात याप्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी असतो.
दरम्यान, सेक्सचा अर्थ केवळ शारीरिक जवळीक नसून, दोन जोडीदारांमधील भावनिक संबंध मजबूत करणे हा आहे. सेक्स त्यासाठीसुद्धा बराच फायदेशीर ठरतो
(टीप- वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये.)
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)