Sex Tips for Valentine’s Day 2021: व्हॅलेंटाईन डे ला आपल्या जोडीदारासोबत सेक्सचा अनुभव अविस्मरणीय करण्यासाठी खास टिप्स
यात गर्भधारणेची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा वेळी प्रेमवीरांनी काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
फेब्रुवारी महिना म्हटला की गुलाबी थंडीचा, गुलाबी प्रेमाचा दिवस! कारण या महिन्यात 14 फेब्रुवारीला येणारा व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) हा प्रत्येक कपल्ससाठी खूपच खास असतो. याआधी व्हॅलेंटाईन डे सप्ताह सुरु झालेला असतो. ज्यात रोज डे, हग डे, किस डे अनेक डेज असतात. त्याचा अंतिम दिवस असतो तो व्हॅलेंनटाईन डे!! या दिवशी प्रत्येकजण आपल्या जोडीदारासोबत हा गुलाबी दिवस साजरा करतो. अशा वेळी कळत नकळत मोहाचा क्षण येण्याची शक्यता असतो. कारण या वेळी प्रत्येक कपल प्रेमामध्ये आकंठ बुडालेला असतो. अशा वेळी काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
या प्रेमाच्या दिवशी आलेला मोहाचा क्षण रोखणं अविवाहित कपल्सना थोडं अवघड जाते. यात गर्भधारणेची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा वेळी प्रेमवीरांनी काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
1. कंडोमचा वापर करा- व्हॅलेंटाईन डे आपल्या प्रिय व्यक्तीसोबत आलेला मोहाचा क्षण आपण रोखू शकत नाही मात्र एक कंडोम वापरल्यास या क्षणाचा आनंद तुम्हाला घेता येईल. तथापि, विवाहित जोडप्यांचे देखील फॅमिली प्लॅनिंग असेल तर त्यांनीही कंडोमचा वापर अवश्य करावा.
2. कंडोम खरेदी करताना एक्सपायरी डेच तपासून घ्या- कंडोम खरेदी करताना त्याची एक्सपायरी डेट अवश्य पाहा. कारण जुने झालेले कंडोम सेक्स दरम्यान फाटण्याची शक्यता असते.
3. उष्णतेमुळे कधी कधी कंडोम फाटण्याची शक्यता असते. अशा वेळी कंडोम फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे ते घालण्यासाठी जास्तीचा वेळ घ्या.हेदेखील वाचा- Sex Tips For Men: महिलांना सेक्स दरम्यान बेडवर कोणत्या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात? वाचा सविस्तर
4. इंटरकोर्स दरम्यान कंडोम आवश्यक आहे. मात्र जेव्हा ओरल किंवा अॅनल सेक्स करता त्वेहा कंडोम एसटीडी आणि एसटीआय पासून सुरक्षित करण्यासाठी चांगली संधी आहे.
5. स्वत:ची वैद्यकिय तपासणी करून घ्या- नवीन पार्टनरसह सेक्स रिलेशन ठेवण्याआधी पहिली तपासणी करा जेणेकरून तुम्हाला सुरक्षित सेक्स एन्जॉय करता येईल.
6. सेक्स नंतर महिलांनी मूत्रविसर्जन करणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुमचे शरीर युटीआयपासून सुरक्षित राहते.
7. डबल प्रोटेक्शनचा 'डबल बॅगिंग' करण्याचा मूर्खपणा करू नका. यामुळे कंडोमची प्रभावशीलता कमी होते.
या सेक्स टिप्स तुम्हाला कदाचित आवडणार नाही. मात्र सुरक्षित सेक्स करण्यासाठी या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे आणि विशेषत: तुम्ही जर अविवाहित असाल तर या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. म्हणून लेखात दिलेल्या कोणत्याही टिप्स किंवा सूचना अवलंबताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.)