Sex साठी Viagra पेक्षाही फायदेशीर आहे ऑलिव्ह ऑइल; शीघ्रपतन व नपुंसकत्व सारख्या समस्येंवर ठरू शकतो उपाय

होय, शारीरिक संबंध ठेवताना बरेच पुरुष व्हायाग्रा (Viagra) सारख्या औषधांचा उपयोग करतात

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

सेक्स (Sex) दरम्यान, बरेच पुरुष आपल्या जोडीदाराचे समाधान करण्यासाठी लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या औषधांचा वापर करतात. होय, शारीरिक संबंध ठेवताना बरेच पुरुष व्हायाग्रा (Viagra) सारख्या औषधांचा उपयोग करतात. व्हायाग्रा जरी सेक्स दरम्यान आपली लैंगिक शक्ती वाढविण्यात मदत करू शकत असेल, परंतु याचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम देखील होऊ शकतो. अशा परिस्थितीत, एक असा पर्याय आहे जो तुमची सेक्सची गरज उत्तमरीत्या पूर्ण करण्यास मदत करू शकेल आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. यासाठी ऑलिव्ह ऑईल (Olive Oil) हा एक उत्तम व नैसर्गिक उपाय ठरू शकतो.

ऑलिव्ह ऑईलचे सेवन करणारे पुरुष इतर पुरुषांपेक्षा बेडवर चांगली कामगिरी दाखवतात, हे एका अभ्यासात सिद्ध झाले आहे. ऑलिव्ह ऑईल शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास तसेच, पुरुषांमध्ये लैंगिक ड्राइव्ह वाढविण्यात आणि नपुंसकत्व कमी करण्यास मदत करते. हे तेल नैसर्गिकरित्या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढविण्यात मदत करते. ऑलिव्ह ऑईल केवळ लैंगिक जीवनासाठीच वरदान नाही, तर त्याचे नियमित सेवन केल्याने आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत.

ऑलिव्ह ऑईलचे फायदे -

  1. ऑलिव्ह ऑईलमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट आढळते, हे हेल्दी फॅट आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
  2. ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. याचे नियमित सेवन केल्याने, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आरोग्यही चांगले राहते.
  3. ऑलिव्ह ऑईलमध्ये आढळणार हेल्दी फॅट हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे, म्हणून त्यामुळे स्ट्रोक येण्याचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो. म्हणजेच याचे नियमित सेवन केल्यास हृदयरोग होण्याचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.
  4. जे लोक ऑलिव्ह ऑइलमध्ये बनवलेले पदार्थ खातात, त्या लोकांची हाडे मजबूत असतात. अशा लोकांच्या रक्तामध्ये ओएस्तोकल्सिन जास्त प्रमाणात निर्माण होते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
  5. ऑलिव्ह ऑइलमध्ये Anti Inflammatory गुणधर्म भरपूर असतात, म्हणून ते आहारात समाविष्ट केल्यास शरीराची सूज कमी होण्यास मदत होते. (हेही वाचा: Sex Knowledge: जाणून किती वेळा सेक्स केल्याने खुश होऊ शकतो जोडीदार; कधी ठेवावे लैंगिक संबंध व त्याची योग्य वेळ)

दरम्यान, इरेक्टाइल डिसफंक्शनच्या उपचारात ऑलिव्ह ऑइल वायग्रापेक्षा अधिक प्रभावी असू शकते, असा शोध अथेन्स विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी लावला आहे. ऑलिव्ह ऑइलमुळे लिंगाचा ताठरपणा जास्त काळ टिकून राहतो असे रिसर्चमधून सिद्ध झाले आहे.

(या लेखात दिलेली माहिती ही इंटरनेटवर  उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर आहे. याबाबत आपला जोडीदार व डॉक्टरांशी बोलून योग्य तो सल्ला घ्यावा) 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif