New Year Sex Tips: आपल्या पार्टनरला उत्तेजित करण्यासाठी कामी येतील 'Seduction Tricks 101'
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

आपल्या पार्टनरला शारीरिक संबंध ठेवण्यास उत्तेजित करणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. सेक्स (Sex) या गोष्टीचा अनुभव जोडप्यांना तेव्हाच उत्तम रित्या घेता येईल जेव्हा त्या दोघांचाही या गोष्टीसाठी मूड असेल. अन्यथा ही गोष्ट खूप किळसवाणी वाटेल किंवा हे करताना तुम्हाला परमोच्च सुखाचा आनंद उपभोगता येणार नाही. यासाठी आपल्या पार्टनरला उत्तेजित करणे खूप गरजेचे आहे. अनेकांना आपल्या पार्टनरला रोजच्या कामांमुळे, धकाधकीच्या जीवनामुळे खूप थकवा जाणवत असतो. अशा वेळी त्यांची सेक्स करण्याची इच्छा होत नाही. किंवा कधी काही पार्टनरसोबत खुट्ट झालं असेल तेव्हाही आपल्याला सेक्सची इच्छा होत नाही. अशावेळी त्यांना उत्तेजित करुन त्यांचा मूड बनवणे गरजेचे आहे.

आपल्या पार्टनरचा मूड बनविण्यासाठी त्यांच्यावर Seduction Tricks 101 चा अंमलात आणणे गरजेचे आहे. जाणून घ्या त्या खास टिप्स

1. डर्टी टॉक्स (Dirty Talks)

सेक्स पूर्वी तुम्ही तुमच्या पार्टनरशी एखाद्या चित्रपटातील किंवा सोशल मिडियावरील एखाद्या हॉट, सेक्सी सीन्सविषयी बोला. मूळ विषयाला डायरेक्ट हात घालू नका.

2. तुमचे कपडे

तुमच्या पार्टनरला तुमच्याकडे आकर्षित करण्यासाठी तुम्ही थोडे सेक्सी आणि हॉट दिसाल असे कपडे परिधान करा. तुमची अंर्तवस्त्रेही तशी असू द्या.

हेदेखील वाचा- Sex Tips: सेक्सचा अनुभव आणखी रोमँटिक करण्यासाठी चुंबनाद्वारे खेळा हे '5' मजेशीर गेम्स

3. तुमचे हावभाव

तुमच्या हावभावातून तुम्ही तुमच्या पार्टनरला उत्तेजित करु शकता. उदा. पुरुषांना महिलांचे ओले केस पुसताना खूप आवडतं. तर स्त्रियांना पुरुषांचा शरीरयष्टी खूप आवडते.

4. पॉर्न (Porn)

आपल्या जोडीदाराला उत्तेजित करण्यासाठी त्याला एखादा पॉर्न व्हिडिओ वा चित्रपट दाखवा.

या आयडियाज जरी सोप्या वाटत असल्या तरी त्या व्यवस्थितरित्या, बुद्धीचातुर्याने केल्यात तर समोरचा उत्तेजित होईल. अन्यथा तुम्ही नाटक करत आहात असा तुमच्या जोडीदाराला वाटेल.