कोणासोबतही शेअर करु नका आयुष्यातील या '7' गोष्टी !
त्यामुळे आपली सगळी गुपितं तिकडे उघडी होतात. तुम्हीही असे करता का?
काही गोष्टी आपण आई-वडील, भाऊ-बहीण आणि जवळच्या नातेवाईकांपासून अगदी सहज लपवू शकतो. पण फ्रेंड्सची गोष्टच निराळी असते. कारण फ्रेंड्ससोबत आपण अधिक वेळ घालवतो. अनेक गोष्टी न संकोचता शेअर करतो. बेस्ट फ्रेंडवर तर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. त्यामुळे आपली सगळी गुपितं तिकडे उघडी होतात. तुम्हीही असे करता का? पण आयुष्यातील काही गोष्टी फक्त तुमच्या पुरत्याच राहिल्या तर योग्य ठरतील. अन्यथा त्या थट्टेचा विषय ठरतील. म्हणूनच या गोष्टी सिक्रेट ठेवणेच योग्य...
पैशांसंबधित माहिती
घर आणि वैयक्तिक आयुष्यातील सर्वच गोष्टी तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडसोबत शेअर करता का? हो. तर मग जरा थांबा. कारण पैशासंबंधीच्या कोणत्याही गोष्टी आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करु नका. विशेषत: जर तुमचा पार्टनर आर्थिक तणावात असेल तर ही गोष्टी अजिबात कोणासोबत शेअर करु नका. कारण भलेही ती व्यक्ती तोंडावर तुम्हाला सहानभुती देईल. पण मागून तो तुमच्या थट्टेचा विषय बनेल.
सेक्स लाईफबद्दल
तुमची सेक्स लाईफ नेहमी सिक्रेटच असालयला हवी. सेक्स लाईफमधील मज्जा, आनंद, किस्से, खास गोष्टी कधीही कोणासोबत शेअर करु नका. कारण त्यावरुन तुमची थट्टा होऊ शकते.
पार्टनरचे इनकम
मुलींच्या पोटात काही राहत नाही, असे म्हटले जाते. ती आपल्या फ्रेंड्ससोबत सर्व काही शेअर करते. पण तुमच्या पार्टनरचे इनकम गुलदस्तातच ठेवलेले चांगले. याचा उल्लेख तुमच्या बेस्ट फ्रेंडसोबतही करु नका. याबद्दल जर तुमच्या पार्टनरला कळले तर तुमच्या नात्यातही ताण निर्माण होईल.
भूतकाळातील गोष्टी
तुमच्या आयुष्यात साथीदारापूर्वी इतर कोणी असल्यास याबद्दल इतरांना सांगू नका. कारण भूतकाळातील गोष्टी किंवा चुका भविष्यात दुःख किंवा त्रासच देतील. त्याचबरोबर तुमची प्रतिमा मलिन होण्याची शक्यताही असते.
गिफ्टबद्दलच्या गोष्टी
तुमच्या साथीदाराने दिलेले एखादे गिफ्ट तुम्हाला आवडले नसल्यास त्याबद्दल कुठेही वाच्यता करु नका. कारण तुमच्या फ्रेंड्सकडून चुकून जरी ही गोष्ट तुमच्या पार्टनरला कळली तर त्याच्या/तिच्या भावना दुखावल्या जातील.
भांडण/तक्रारी
प्रेमाच्या नाते अनेकदा छोटे-मोठे वाद होतात. भांडणे, रुसवाफुगवी होत असते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येक गोष्टीचे प्रदर्शन मांडाल. कारण तुमच्या वादाबद्दल तुम्ही सर्व काही फ्रेंड्ससोबत शेअर केल्यास त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या नात्यावर होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या वैयक्तिक गोष्टींवरुन इतरांसमोर रडणे टाळा.
साथीदाराचे दुर्गण
कोणतीही व्यक्ती ही परफेक्ट नसते, हे आधी नीट समजून घ्या. त्यामुळे तुमच्या पार्टनरमध्येही काही गुणदोष असू शकतात. परंतु, याचा उल्लेख सर्वांसमोर करु नका. अगदी बेस्ट फ्रेंडसमोरही. ही गोष्ट स्वतः पुरती मर्यादीत ठेवणे केव्हाही चांगले. अन्यथा तुमची आणि तुमच्या पार्टनरची प्रतिमा इतरांच्या नजरेत खराब होण्याची शक्यता आहे.