हस्तमैथुन/ प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Usplash)

हस्तमैथुन म्हणजेच मास्टरबेशन (Masturbation) करणे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असल्याचे जगातील बहुतांश लोकांना माहिती आहे. दररोज मास्टरबेशन केल्याने तणाव आणि आरोग्यासंबंधित काही त्रास दूर होतात. त्याचसोबत प्रोटेस्ट कॅन्सरचा (Prostate Cancer) आजारसुद्धा दूर होतो. तुम्हाला मास्टरबेशन करण्याचे फायदे (Benefits of Masturbation) तर माहितीच असतील. पण तुम्हाला हे माहिती आहे का मास्टरबेशनचा संबंध हा व्यवस्थापकीय कौशल्यांशी (Managerial Skills) निगडीत आहे. त्यामुळे जर तुम्हाला याबद्दल माहिती नसल्यास ही गोष्ट खरी असून एका अभ्यासातून याचा खुलासा करण्यात आला आहे.

त्यामुळे मास्टरबेशन करणारी व्यक्ती ऑफिसमधील कामात अव्वल असतातच त्याचसोबत अशा व्यक्ती पगार सुद्धा बक्कळ मिळवतात. युनीविया (Univia) यांनी केलेल्या अभ्यासातून या गोष्टीचा खुलासा करण्यात आला आहे. तसेच मास्टरबेशन करणाऱ्या व्यक्तींचे ऑफिसातील अन्य व्यक्तींसोबत चांगले जमते आणि मोठी पोस्ट मिळण्याची सुद्धा त्यांना शक्यता असते.

या अध्ययनात 1012 लोक हस्तमैथुन  करण्याची सवय आणि नोकरीवरुन एक सर्वेक्षण करण्यात आले. याचा निकाल धक्कादायक होता. या सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की, ज्या व्यक्ती आठवड्यामधून कमीत कमी एक दिवस हस्तमैथुन  करतात त्या व्यक्ती कामाच्या ठिकाणी आपली छाप सोडतात. तसेच हस्तमैथुन  करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी उच्च पद मिळण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी जर पगारवाढीची अपेक्षा 8 टक्के अधिकपट असते.

तसेच हावर्ड युनिवर्सिटी (Harvard University)  मध्ये नुकत्याच एका संशोधनानुसार, ज्या पुरुषांनी हस्तमैथुन  केले आहे त्यांना प्रोटेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता फार कमी असते. तसेच जे पुरुष प्रत्येक महिन्याला 21 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा ऑर्गेज्म करतात त्यांना सुद्धा प्रोस्टेट कॅन्सरचा धोका संभवत नाही.(Sex मध्ये पुरुषांना परमोच्च आनंद कशाने मिळतो? जोडीदाराला खुश ठेवण्यासाठी स्त्रियांना या गोष्टी माहिती असायलाच हव्या)

दरम्यान हस्तमैथुन  करण्याचे बरेच फायदे आहेत. यामुळे तणाव कमी होण्यासोबत रक्त संचार सुरळीत होतो. तसेच मास्टरबेशनमुळे झोप पूर्ण होण्यासोबत एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता सुद्धा वाढते. एवढेच नाही तर मूड आणि सेक्स लाइफ सुद्धा उत्तम राहते.