मुलींसोबत बोलण्याची भीती वाटते? तर मुलांनी 'या' टीप्स नक्की वापरा
मात्र मुलींसोबत बोलण्याची वेळ येते तेव्हा काहीजणांना भीती वाटते किंवा अडखळ्यासारखे त्यांच्यासमोर बोलतात. यामुळे मुलीच्या मनात त्या मुलाबद्दल विविध प्रश्न उपस्थितीत होतात.
काही लोक जगासमोर आपण खुप आत्मविश्वासी असल्याचे भासवतात. मात्र मुलींसोबत बोलण्याची वेळ येते तेव्हा काहीजणांना भीती वाटते किंवा अडखळ्यासारखे त्यांच्यासमोर बोलतात. यामुळे मुलीच्या मनात त्या मुलाबद्दल विविध प्रश्न उपस्थितीत होतात.
मात्र जर तुम्ही एखाद्या मुलीसोबत बोलण्याचा प्रयत्न केल्यास सुरुवातीला तुम्हाला भीती वाटेल. मात्र तुमचे मत मुलीसमोर तुम्ही स्पष्टपणे मांडण्यात यशस्वी झाल्यास तुमचा हळूहळू आत्मविश्वास सुद्धा वाढेल. त्यामुळे मुलांनी मुलींसोबत बोलण्याची भीती वाटत असल्यास या टीप्स नक्की वापरा.(Break Up झाल्यावर चुकूनसुद्धा करु नका 'या' गोष्टी, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल)
>'या' पद्धतीने स्वत:ला मुलींसमोर सादर करा
जर तुम्हाला एखाद्या मुलीसोबत बोलण्यास भीती वाटत असल्यास घाबरु नका. कारण मुलींना आत्मविश्वासू आणि स्पष्ट बोलणारी मुले आवडतात.. त्याचसोबत मुलीसोबत उत्तम वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.
>परिधान केलेले कपडे स्वच्छ असू द्या
स्वच्छतेच्या गोष्टी मुली जरा जास्तच गंभीर्याने घेतात. त्यामुळे मुलीसमोर जाताना उत्तम पोशाखात तिला भेटण्यासाठी जा. त्याचसोबत नेहमी स्वच्छ कपडे परिधान करा. तर कोणतेही कपडे परिधान करण्यापूर्वी तुमच्यावर ते चांगले दिसत आहेत की नाही ते नीट पाहा.
>मुलीला सरप्राईज द्या
मुलींना सरप्राईज दिलेले फार आवडते. त्यामुळे त्यांना आनंदात ठेवण्यासाठी छोट्यामोठी शक्कल लढवून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणा. त्याचसोबत तुमच्या एखाद्या गोष्टींमुळे तिला वाईट वाटणार नाही याची काळजी घ्या.
या मार्गांचा अवलंब केल्यास तुम्हाला एखाद्या मुलीसोबत बोलताना लाज किंवा भीती वाटणार नाही. उलट तुमचा आत्मविश्वास अधिक वाढेल आणि त्याचसोबत तुमची मुलीसोबत उत्तम मैत्री होईल.