क्रश असलेल्या व्यक्तीच्या मनातील गुपित समजुन घेण्यासाठी 'या' युक्तीचा वापर करा
जरी समोरील व्यक्ती आपल्याला ओळखत नसली तरीही आपल्याला त्या व्यक्तीच्या बऱ्याच गोष्टींबाबत माहिती करुन घेणे आवडू लागते. यामधून व्यक्तीच्या मनात त्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल क्रश निर्माण होण्यास सुरुवात होते.
सध्या प्रेमाचे नाते जोडण्यापूर्वी काही जणांच्या मनात एखाद्याबद्दल आपुलकीची भावना मनात येते. जरी समोरील व्यक्ती आपल्याला ओळखत नसली तरीही आपल्याला त्या व्यक्तीच्या बऱ्याच गोष्टींबाबत माहिती करुन घेणे आवडू लागते. यामधून व्यक्तीच्या मनात त्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल क्रश निर्माण होण्यास सुरुवात होते. त्यानुसार त्या व्यक्तीला पाहिले किंवा त्या व्यक्तीने एखादी गोष्ट केली की ती आपण सुद्धा करावी असे वाटू लागते. यामुळे दिवसेंदिवस क्रशच्या व्यक्तीबाबत आपण त्याच्या मनातील आपल्या बाबत नक्की काय विचार आहेत हे जाणून घेण्यासाठी फार उत्सुक होते. मात्र सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वजण आपल्या मनातील गोष्ट सहज बोलतता. पण एकमेकांच्या समोर आल्यास ती गोष्ट बोलण्यास भीती किंवा लाजिरवाणे झाल्यासारखे वाटते. त्यामुळेच जर तुम्हाला क्रश असलेल्या व्यक्तीच्या मनातील गुपित समजुन घ्यायचे असल्यास 'या' युक्तीचा वापर करा.
>>जर एखादी व्यक्ती तुम्हाला पसंत करत असल्यास ती चॅटिंग करता तुम्हाला निक नावाने बोलत राहिल. त्यामुळे समोरचा व्यक्ती तुमच्या प्रेमात पडत चालल्याचे संकेत तुम्हाला येथून दिसून येतील.
>>अगदी साधे बोलणे असो किंवा नातेवाईकांसोबत बोलणे असो लोक त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी इमोजींचा बहुतांश वापर करत नाहीत. मात्र क्रश सोबत बोलताना लोक किस किंवा हार्ट असलेले इमोजी जास्त वापरतात.
>>एकमेकांनबाबत विचारपूस करण्यासोबत दिवसभर काय करणार याचे प्लॅनिंग सुद्धा क्रश व्यक्तींना जाणून घ्यायला आवडते. त्यामुळे तुम्हाला डेट करण्यासाठी एक ही संधी क्रश कडून सोडली जाऊ शकत नाही.(First Night Tips: लग्नाच्या पहिल्या रात्री स्त्रियांना हव्या असतात 'या' गोष्टी; हळुवार सुरुवात करा आणि अनुभवा Memorable Moment)
>>तुम्हाला समोरचा व्यक्ती पसंत करत असल्यास तो तुम्हाला त्याच्या लहानपणीच्या गोष्टी किंवा फोटो शेअर करेल. व्यक्ती अशा गोष्टी एकमेकांना पाठवतात ज्या मधून एखाद्याला आपल्या आयुष्याचा महत्वाचा हिस्सा बनवू पाहत असतात.
एवढेच नाही तर सध्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून चॅटिंग करताना तुम्ही डिपी किंवा एखादे स्टेटस ठेवल्यास तुम्हाला त्यावर क्रश कडून कमेंट केली जाईल. तसेच एकमेकांबाबत अधिक जाणून घेणे आणि एकमेकांना समजून घेणे हे नात्यामधील सर्वात महत्वाची गोष्ट आहे.