Sex Tips: सेक्स करण्यापूर्वी करा 'या' थ्रिलिंग गोष्टी, ज्यामुळे पुरुष पार्टनर तुमचे होतील दिवाने
मात्र तरीही कधी कधी काही हटके गोष्टी ट्राय करुन तुम्ही पुरुष जोडीदाराला खूश करु शकता.
पुरुष जोडीदाराला सेक्स (Sex) दरम्यान वश करता आले तर याहून सुंदर गोष्ट महिलांसाठी काय असू शकते?.. सेक्ससाठी नेहमी पुरुष जोडीदाराने पुढाकार घ्यावा असा जणू एक नियम ठरला आहे तो नियम मोडून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न महिला जोडीदाराने केला तर पुरुषांना का आवडणार नाही. कधी कधी महिला सेक्ससाठी उत्तेजित असतात मात्र पुरुषांचा मूड नसतो. अशा वेळी महिला पार्टनरने काही रोमांटिक आणि हटके गोष्टी करुन पुरुषांना बेडपर्यंत आणू शकता. यामुळे बेडवर सेक्स दरम्यान पुरुष जोडीदाराकडून देखील मोलाची साथ मिळू शकते.
तसे पाहायला गेले तर पुरुषांना सेक्ससाठी उत्तेजित करण्यासाठी महिलेचे सौंदर्यचं पुरेसे असते. आपल्या महिला जोडीदाराला नग्न अवस्थेत पाहिले की पुरुष जोडीदाराचा स्वत: वर ताबा राहत नाही. मात्र तरीही कधी कधी काही हटके गोष्टी ट्राय करुन तुम्ही पुरुष जोडीदाराला खूश करु शकता.
1. पुरुष जोडीदाराशी छेडछाड करा
आपल्या पुरुष जोडीदारासोबत थोडीशी छेडछाड करा. त्यांच्या केसांत हात फिरवणे, त्यांच्या कानावरुन, छातीवरुन हात फिरवणे, शर्टच्या बटणांशी छेडछाड करणे अशा गोष्टी करु शकता.
2. त्यांची पँट काढा
थोडं रोमँटिक आणि रोमांचक अंदाजात त्यांची पँट काढा. त्यांच्या पँटचा बेल्ट काढून तुम्ही किती सेक्ससाठी उत्तेजित आहात हे दाखवा.हेदेखील वाचा- Sex Tips for Virgin Woman: व्हर्जिन महिलांनी पहिल्यांदा सेक्स करताना घ्या 'या' गोष्टींची काळजी
3. बॉक्सर काढा
पुरुष जोडीदाराशी फोरप्ले करत त्यांना उत्तेजित केल्यास एका पॉइंटला येऊन तुम्ही त्यांचे बॉक्सर काढून सेक्सला सुरुवात करु शकता.
4. तुमचे कपडे काढा
तुमचे एक एक कपडे रोमँटिक अंदाजात काढा. सेक्सचा अनुभव द्विगुणित करण्यासाठी तुम्ही स्वत: कपडे पुरुष जोडीदारासमोर उभे राहून हळूहळू काढण्यास सुरुवात करा. ज्यामुळे तुमच्या शरीराचा एक एक भाग पाहून पुरुष जोडीदार उत्तेजित होईल.
या ट्रिक्स वाचून तुमच्या पोटात कदाचित गुदगुल्या होऊ लागल्या असतील किंवा काहींना त्या थोड्या विचित्र वाटत असतील. मात्र सेक्स ही गोष्ट खूपच खाजगी असते. त्यामुळे जोडप्यांमध्ये सेक्स लाईफ दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी तुम्ही या गोष्टी नक्की ट्राय करु शकता.
(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.)