Car Sex Tips: कार मध्ये सेक्सचा अनुभव आणखी थ्रिलिंग करण्यासाठी खास टिप्स

यावेळी काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

आपल्या जोडीदारासोबत तुम्ही आहात त्या ठिकाणी सेक्सचा अनुभव आणखी थ्रिलिंग करण्याची अनेकांची इच्छा असते. त्यामुळे सेक्स टॉय (Sex Toy) , फोरप्ले दरम्यान तुम्ही सेक्सचा अनुभव आणखी वाढवू शकता. यासाठी काय करता येईल असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आपण आहोत त्या ठिकाणी मोजक्या प्रॉपर्टीसह काय करता येईल, ज्यामुळे तुमची सेक्स लाईफ (Sex Life) खूपच थ्रिलिंग आणि साहसी बनेल असा विचारात अनेकजण असतात. यात कारमध्ये सेक्स करणे (Car Sex) अशी इच्छा देखील अनेकांच्या मनात असते. कारमध्ये सेक्स करणे ही अनेकांची फँटसी असते. किंबहुना त्यांना ती गोष्ट आवडते.

विशेषत: पावसाळ्यात कारमध्ये सेक्स मध्ये अनेकांना फार आवडते. सेक्स करताना गाडीमध्ये निर्माण झालेली उष्णता आणि बाहेरील थंड वातावरणामुळे कारच्या काचेवर तयार झालेले दवबिंदू यामुळे सेक्सचा उत्साह अधिक वाढतो. यावेळी काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

1. सेक्स पोजिशन्स

कारमध्ये सेक्स करताना सर्वप्रथम आतील जागेचा विचार करुन त्यानुसार सेक्स पोजिशन्स असाव्यात. कारण जागेची कमतरता असल्यामुळे तुम्ही बेडरूममध्ये करता त्याप्रकारच्या सेक्स पोजिशन्स तुम्ही करु शकत नाही. अशा वेळी मिशनरी वा ऑन द टॉप पोजिशन्स करणे थोडे सोपे जाईल. कारमध्ये व्हजानयल पेक्षा ओरल सेक्स करणे जास्त सोपे जाऊ शकते.हेदेखील वाचा- Sex Tips: पुरुषांमधील 'या' क्वालिटीज महिलांना सेक्ससाठी करतात आकर्षित

2. कारमध्ये काचेवरील पडदे अवश्य घ्या

कारमध्ये सेक्स करताना कारचे पडदे व्यवस्थितरित्या ओढून घ्या. जर तुम्हाला पडदे नको हवे असतील तर काचा काळ्या करण्यासाठी विंडो-सन शेड्स देखील कारमध्ये लावू शकता. मात्र सेक्स करण्यापूर्वी या गोष्टी कारमध्ये आहेत की नाही याची खात्री करा.

3. थोडी एकांत (मात्र सुरक्षित) जागा निवडा

अनेकदा कपल्स कारमध्ये सेक्स करण्यासाठी पार्किंग वा नाइट क्लबच्या बाहेर अशी कोणतीही जागा निवडतात. मात्र तसं न करता एक निर्मनुष्य मात्र सुरक्षित अशा ठिकाणी कार सेक्स करा.

4. चांगले कपडे घाला

कारमध्ये जागेची कमतरता असल्यामुळे सेक्स करण्याची इच्छा असल्यास चांगले आणि अगदी सहजपणे काढता येतील वा घालता येतील असे कपडे घाला. नाहीतर ऐनवेळी पंचाईत होऊ शकते.

कारमध्ये सेक्स करण्याचा अनुभव देखील खूप वेगळा आणि थ्रिलिंग असतो. विवाहित कपल्सपेक्षा अविवाहित जोडपी हा अनुभव अनेकदा घेतात. कारमध्ये सेक्स करताना सध्याच्या काळात योग्य ती काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे ही गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा.

(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.)