Sex Tips For Women: सेक्स दरम्यान महिलांनी टाळा 'या' गोष्टी नाहीतर पुरुष जोडीदार तुमच्यावर होतील नाराज
नाहीतर तुमच्या पुरुष जोडीदाराचा हिरमोड होऊन ते अर्ध्यावरुन उठून जाण्याची शक्यता असते.
सेक्ससाठी (Sex) दरवेळेस पुरुषांनीच पुढाकार घ्यावा असे काही नाही. कधी कधी जर महिलांनी पुढाकार घेतला तर पुरुषांना आवडणार नाही असे होणारच नाही. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये सेक्स करण्याची इच्छा अधिक असते असे आपल्याला अनेकदा ऐकायला मिळते. मात्र याचा अर्थ स्त्रीमध्ये संभोगाची भावनाच नसते असे नाही. मात्र महिलांनी पुढाकार घेऊन काही ठराविक गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही तुमच्या पार्टनरला ऑर्गेज्मचा (Orgasm) आनंद देऊ शकता. पुरुष सेक्स दरम्यान खूप लवकर उत्तेजित होतात मात्र जर महिलांनी पुढे दिलेल्या चुका केल्या तर त्यांना पुरुषांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागले.
जर महिलांना पुरुषांना बेडवर खिळवून ठेवायचे असेल तर त्यांनी पुढे दिलेल्या गोष्टी टाळाव्यात. नाहीतर तुमच्या पुरुष जोडीदाराचा हिरमोड होऊन ते अर्ध्यावरुन उठून जाण्याची शक्यता असते.
1. ओरल सेक्स दरम्यान त्यांच्या पेनिसला दातांनी स्पर्श करणे
ब्लो जॉब हा उत्तेजित करण्याचा आणि पुरुषाला ऑर्गेज्मचा अनुभव देण्याचा प्रकार आहे. मात्र यात जर स्त्रियांना त्यांच्या पेनिस दातांनी चावल्या वा दातांचा स्पर्श त्यांच्या पेनिसला झाला तर त्यांना अजिबात आवडत नाही.हेदेखील वाचा- Sex Tips: आपल्या पुरुष पार्टनरला बेडवर अधिक काळ रोखून ठेवण्यासाठी खास सेक्स टिप्स
2. अंडरगारमेंट्सला उग्र वास येणे
दिवसभराच्या कामामुळे अनेकदा स्त्रियांच्या अंडरगारमेंट्स घामामुळे उग्र वास येतो. या उग्र वासामुळे पुरुषांना सेक्स करण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे सेक्सपूर्वी स्वच्छ अंडरगारमेंट्स घाला.
3. संभोगादरम्यान फोन कॉल घेणे
सेक्स दरम्यान जर महिलांनी फोन उचलला तर पुरुषांना तो त्यांचा अपमान वाटतो. ज्यामुळे सेक्स लाईफवर परिणाम होण्याची शक्यता असते.
4. पुरुषांकडूनच नेहमी सुरुवात करण्याची अपेक्षा करणे
पुरुषांनीच नेहमी सुरुवात करावी ही गोष्ट त्यांना पटण्यासारखी नसते. यामुळे आपल्या महिला जोडीदाराला सेक्समध्ये किंबहुना आपल्यामध्ये काही रस नसल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होते.
5. मूड चांगला नाही असे पुरुषांना बहाणे सांगणे
सेक्ससाठी मूड चांगला नाही असे बहाणे स्त्रियांनी दिल्यास ते पुरुषांना अजिबात आवडत नाही. कारण असे बहाणे आपली महिला जोडीदार आपल्याला टाळते असा त्यांचा गैरसमज होतो. ज्याच्या परिणाम सेक्स लाईफवर होतो.
पुरुष जसे सेक्स दरम्यान महिलांच्या भावनांचा आदर करतात तसे स्त्रियांनी देखील पुरुषांच्या मनाचा, त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. त्यामुळे वर दिलेल्या गोष्टी जर टाळल्या तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला सेक्स दरम्यान 'Oh Yes' चा अनुभव नक्की देऊ शकाल.
(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.)