Kalpana Chawla Birth Anniversary: अंतराळात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कल्पना चावला यांच्याविषयी जाणून घ्या काही रोचक गोष्टी
त्यांचं कार्य आपल्याला नेहमी प्रेरणा देत राहतं. यापैकी एक म्हणजेच भारतीय वंशाची अंतराळात जाणारी पहिली महिला 'कल्पना चावला.' कल्पना चावला यांचा शेवटचा अंतराळ प्रवास आजही अनेकांच्या मनात कोरला गेला आहे.
Kalpana Chawla Birth Anniversary: आपल्या आयुष्यात काही अशा व्यक्ती असतात ज्या नेहमी आपल्या लक्षात राहतात. त्यांचं कार्य आपल्याला नेहमी प्रेरणा देत राहतं. यापैकी एक म्हणजेच भारतीय वंशाची अंतराळात जाणारी पहिली महिला 'कल्पना चावला.' (Kalpana Chawla) कल्पना चावला यांचा शेवटचा अंतराळ प्रवास आजही अनेकांच्या मनात कोरला गेला आहे.
कल्पना चावला यांचा जन्म 17 मार्च 1962 रोजी झाला. त्यांच बालपण हरियाणाच्या कर्नालमध्ये गेलं. त्या अंतराळात भरारी घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. कल्पना चावला यांनी 1976 साली कर्नाल टागोर स्कूलमधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. तसचं 1982 साली पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून वैमानिक इंजिनीअरिंग (Aeronautical Engineering) मध्ये पदवी घेतली. त्यानंतर कल्पना चावला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेल्या. 1984 मध्ये त्यांनी 'टेक्सास युनिव्हर्सिटी'मधून वैमानिक इंजिनीअरिंगमध्ये आपलं मास्टर्स पूर्ण केलं. याचं विषयामध्ये त्यांनी पुढे PhD शिक्षण पूर्ण केलं. (हेही वाचा - पुणे: ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन; वयाच्या 88 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास)
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA येथे कल्पना चावला यांनी 1988 पासून फ्ल्युड डायनॅमिक्समध्ये संशोधनाला सुरुवात केली. त्यानंतर त्या ओवरसेट मेथड्स कंपनीत उपप्रमुख म्हणून काम पाहू लागल्या. त्यानंतर काही दिवसांनी नासाने संभाव्य अतंराळवीराच्या यादीत कल्पना यांचा समावेश केला. नोव्हेंबर 1996 मध्ये नासानं एक घोषणा केली. त्यामध्ये ATS-87 मिशनच्या संशोधनाची जबाबदारी कल्पना चावला यांच्याकडे सोपवण्यात आली.
19 नोव्हेंबर 1997 रोजी कल्पनाने अंतराळात झेप घेतली. त्यावेळी त्यांनी 376 तास आणि 34 मिनिटं अंतराळात घालवली. कल्पना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पृथ्वीला 252 फेऱ्या मारल्या. तसचं 1 कोटी 46 हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला. त्यावेळी कल्पना यांच्याकडे 7 सदस्यांच्या टीमचं नेतृत्त्व देण्यात आलं होतं. 2003 मध्ये कल्पना चावला यांची 16 दिवसांच्या मिशनचे विशेष तज्ज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
Kalpana Chawla Birth Anniversary:अंतराळात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला यांच्याविषयी खास गोष्टी - Watch Video
1 फेब्रुवारी 2003 ला कोलंबिया अंतराळ यानाने पृथ्वीकडे येण्यासाठी अमेरिकेजवळच्या पॅसिफिक समुद्राकडं झेप घेतली. त्यावेळी सर्व योग्यरीत्या सुरू होतं. दरम्यान, सकाळी 8.40 वाजता कोलंबिया यानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. केवळ 22 मिनिटांत हे यान पृथ्वीवर उतरणार होतं. परंतु, सुमारे 8.54 वाजता यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटला आणि पृथ्वीवर येणाऱ्या कोलंबिया अवकाशयानाला स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होती की, त्या अवकाशयानाचा अगदी चुरा होऊन गेला होता. या धक्कादायक घटनेमध्ये स्फोट झालेल्या अवकाशयानात कल्पना चावला आणि अन्य अंतराळवीरांचा मृत्यू झाला.