Happy New Year 2020: नवीन वर्षात नेहमी 'सकारात्मक' आणि 'आनंदी' राहण्यासाठी करा 'हे' 5 उपाय
या नवीन वर्षात तुम्ही काही संकल्प करण्याचाही विचार केला असेल. येणाऱ्या नवीन वर्षात नेहमी आनंदी राहण्यासाठी तुमच्यामध्ये नेहमी सकारात्क उर्जा असणे आवश्यक आहे.
Happy New Year 2020: नवीन वर्षाचे म्हणजेच 2020 चे स्वागत करण्यासाठी आता काहीच तास शिल्लक आहेत. या नवीन वर्षात तुम्ही काही संकल्प करण्याचाही विचार केला असेल. येणाऱ्या नवीन वर्षात नेहमी आनंदी राहण्यासाठी (Be Happy) तुमच्यामध्ये नेहमी सकारात्मक उर्जा (Positive Energy) असणे आवश्यक आहे. नेहमी नकारात्मक बोलणाऱ्या मित्रांपासून दूर रहा. अशा लोकांसोबत राहिल्याने तुमची सकारात्मक ऊर्जेची पातळी नकळत कमी होते. सकारात्मक राहण्यासाठी स्वतःला कमी लेखणं, कीव करणं, टाळा. आज आपण या लेखातून नेहमी सकारात्मक राहण्यासाठी कोणते उपाय करावे, हे पाहणार आहोत. आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी नेहमी सकारात्मक राहणे गरजेचे आहे. आपले आरोग्य निरोगी राहिले तर आपले जीवन सुखी आणि आनंदी राहते. त्यामुळे नेहमी हसत-खेळत जगा. कोणी तुमची टीका अथवा प्रशंसा करत असेल तर त्या व्यक्तीचा त्यामागील हेतू काय? हे लक्षात घ्या.
व्यक्तीमत्व विकास करण्यासाठी कर्तृत्ववान लोकांची आत्मचरित्रे, आत्मकथा, चित्रपट बघा. त्यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. नेहमी नीटनेटका पोशाख करा. त्यामुळे तुमच्यामध्ये अंतर्गत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच दिवसात निदान एकदा एका अनोळख्या व्यक्तीला स्वतःहून मदत करा. त्यामुळे तुम्हाला नक्की आनंद मिळेल. (हेही वाचा - Happy New Year 2020: नवीन वर्षात करा 'हे' महत्त्वपूर्ण सामाजिक संकल्प; होईल मोठा फायदा!)
नेहमी सकारात्मक आणि आनंदी राहण्याचे करा हे उपाय -
सकारात्मक मित्र-मैत्रिणींची संगत धरा -
तुम्ही दिवसभर कोणत्या व्यक्तींसोबत राहता याचाही तुमच्या जीवनावर परिणाम होत असतो. त्यामुळे नेहमी अशा मित्र-मैत्रिणींसोबत राहा. ज्यांचे विचार तुम्हाला ऊर्जा देतात. त्यांच्या विचारामुळे तुमच्यामध्ये नवीन ऊर्जा तयार होते. नकारात्मकता निर्माण करणाऱ्या मित्र-मैत्रिणींपासून दूर राहा.
सकस आहार घ्या -
तुमचं आरोग्य चांगलं राहिलं तर तुम्ही सुखी आणि आनंदी राहु शकता. त्यामुळे रोजच्या जेवणात सकस आहार घ्या. जास्त मसाल्याचे पदार्थ खावू नका. आपल्या जेवणात फळे, पालेभाज्या यांचा समावेश करा.
हेही वाचा - Hangover Day 2020: हँगओव्हर पासून बचावण्यासाठी मद्यपान करण्यापूर्वी करा या '5' गोष्टी
दररोज व्यायाम करा -
दररोज व्यायाम करा. व्यायाम केल्याने तुम्ही दिवसभर तणावमुक्त राहता. दररोज व्यायाम केल्याने तुमच्या अंगातील आळस दूर होतो आणि तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते.
पुस्तकांचे वाचन करा -
पुस्तक वाचल्याने आपला व्यक्तीमत्व विकास होतो. तसेच आपल्या ज्ञानात भर पडते. यातून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे पुढील वर्षात तुम्हाला जेवढी जास्त पुस्तकं वाचता येतील तेवढी वाचा.
इतरांसाठी चांगल्या गोष्टी करा -
स्वत:साठी तर सगळेच जगतात. परंतु, जो इतरांसाठी काही तरी चांगले करतो त्याला सकारात्मक ऊर्जेचे दालन खुले होते. स्वत:मध्ये आत्मप्रतिष्ठा निर्माण होते. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार, इतरांना मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यातून तुम्हाला नक्की आनंद मिळेल.