World Environment Day 2020: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'ही' पर्यावरणपूरक झाडं आपल्या घरातली हवा शुद्ध करण्यास करतील मदत

हिरवीगार झाडे दूषित हवा शोषून घेतात आणि वातावरण शुद्ध तसेच घरं सुशोभित करतात. देशात अशी अनेक रोपे आहेत जी आरोग्यासाठी रामबाण औषध म्हणून कार्य करतात. आपण आपल्या घरात हवा शुद्ध करणारे काही झाडं लावू शकतात जेणेकरून तुमच्या घरातील हवा शुद्ध होण्यास मदत होईल.

मनीप्लांट (Photo credit : Wallpaperflare)

दरवर्षी 5 जून हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिन' (World Environment Day) म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे यामागचे महत्वाचे उद्दिष्ट असते. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिन 2020 ची थीम जैवविविधता आहे, एक चिंता ज्याचे वर्णन पर्यावरण दिन समितीने वेबसाइटवर दोन्ही 'त्वरित आणि अस्तित्त्वात' म्हणून केले आहे. हिरवीगार झाडे दूषित हवा शोषून घेतात आणि वातावरण शुद्ध तसेच घरं सुशोभित करतात. शेतात, रस्त्यांच्या कडेला, उद्याने आणि जंगलांमध्ये वृक्ष आणि वनस्पतींच्या अनेक प्रजाती आहेत ज्या लोकांनी आपल्या घरात ठेवण्यास सुरवात केली आहे. देशात अशी अनेक रोपे आहेत जी आरोग्यासाठी रामबाण औषध म्हणून कार्य करतात. हे केवळ फुफ्फुसांचे संरक्षणच करत नाही तर ते मानसिकदृष्ट्या आनंदी ठेवण्यासही उपयुक्त ठरतात. (World Environment Day 2020: पर्यावरण संवर्धन करण्यासाठी 5 सोप्या टीप्स, व्यक्तिगत आयुष्यातही वापरू शकता)

शुद्ध हवा (Fresh Air) आपल्या आरोग्यास किवी उपयुक्त आहे हे विज्ञानच्या अभ्यासाने दर्शवले आहे. आपण आपल्या घरात हवा शुद्ध करणारे काही झाडं लावू शकतात जेणेकरून तुमच्या घरातील हवा शुद्ध होण्यास मदत होईल. यामध्ये, कोरफड, मनी प्लांट, स्नेक प्लांट, गर्बेरा आणि तुळश यांचा समावेश आहे. प्रदूषणामुळे अनेक आजार वाढले आहे आणि त्यामुळे काही पर्यावरण पूरक झाडं आपल्याला निरोगी राहण्यास मदत करू शकतात. मात्र, वृक्ष लागवड करताना कुदळी झाडं लावावीत हा देखील महत्वाचा भाग आहे.

Happy World Environment Day Wishes: जागतिक पर्यावरण दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा Greetings, Images - Watch Video 

वाढत्या तापमानावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने वृक्ष लागवडीचे अभियान राबवले आहे. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, विविध समस्या आणि संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणाविषयी निर्णय घेऊन पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिनाचा मुख्य हेतू आहे.