पुरुषांच्या तुलनेत महिलांना झोपेची अधिक गरज का असते ?

या सगळ्याचा परिणाम झोपेवर होतो.

पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक झोपेची गरज (Photo Credits Unsplash)

महिला आणि पुरुष यांची शारीरिक जडण, रचना वेगळी असते. त्यामुळे शारीरिक गरजाही वेगवेगळ्या असतात. त्याचबरोबर महिला-पुरुषांच्या मानसिक-भाविनक गरजाही निराळ्या असतात. या सगळ्याचा परिणाम झोपेवर होतो. तसंच महिलांना पुरुषांच्या तुलनेत अधिक झोपेची गरज भासते. तर जाणून घेऊया महिलांना झोपेची अधिक गरज का असते? शांत झोपेसाठी रात्री आंघोळ करताना या'4' गोष्टी नक्की सांभाळा !

निवांत झोप न मिळाल्याने

नॅशनल स्लीप फाऊंडेशनच्या अभ्यासानुसार, 63% महिलांना प्रत्येक आठवड्यात निद्रानाशाचा अनुभव येतो. तसंच कामाच्या गडबडीत, धावपळीत निवांत झोप न मिळाल्यामुळे देखील महिलांना अधिक झोपेची गरज भासते. निवांत झोपेसाठी आहारात समाविष्ट करा 'हे' पदार्थ !

अधिक मानसिक ताण

महिला मल्टीटास्कर्स असतात, यात काही शंकाच नाही. घर, ऑफिस, संसार यांसारख्या जबाबदाऱ्या सांभाळताना मानसिक ऊर्जा पुरुषांच्या तुलनेत अधिक वापरली जाते. त्याचा हळूहळू आरोग्यावरही परिणाम होऊ लागतो. त्यामुळे महिलांना पुरुषांपेक्षा अधिक झोपेची आवश्यकता असते.

मोनोपॉज

मासिक पाळीच्या अनेक समस्या असतात त्याच्या त्रास महिलांना सहन करावा लागतो. मासिक पाळी किंवा मेनोपॉजच्या दरम्यान येणारा शारीरिक थकवा, मानसिक ताण, चिडचिड यामुळे पुरेशी झोप गरजेची असते. या काळात पुरेशी झोप न घेतल्यास विनाकारक घाम येणे, भीती, शरीराचे तापमान वाढणे, अशा समस्यांना सामोरे जावे लागते.

पीसीओएस

पुरेशी झोप न घेतल्याने देखील पीसीओएसची समस्या उद्भवते. त्यामुळे योग्य वेळी या समस्येकडे लक्ष द्या. अन्यथा गंभीर समस्या उद्भवू शकतात. रात्री वेळेवर झोपल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांना आळा बसतो.

प्रेग्नेंसी

प्रेग्नेंसीमध्ये हॉर्मोनल बदल झाल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरे जावे लागते. यावेळेस आरामदायी झोप गरजेची असते. रात्री पुरेशी झोप घेतल्याने विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते.