Teflon Flu: सावध व्हा! नॉनस्टिक भांड्यांमधून पसरत आहे 'टेफ्लॉन फ्लू'; 250 लोकांना झाली लागण, जाणून घ्या कशी घ्याल काळजी
त्यानंतर तो शरीरात प्रवेश करून मोठा धोका निर्माण करू शकतो. अहवालानुसार, यामुळे फुफ्फुसात जळजळ होऊ शकते आणि फ्लू सारखी लक्षणे दिसू शकतात.
काळानुरूप स्वयंपाकाच्या पद्धती खूप बदलल्या आहेत. एकेकाळी चुलीवर शिजवलेले अन्न खाल्ले जात असताना, आज गॅस आणि इंडक्शनने आपल्या स्वयंपाकघराचा ताबा घेतला आहे. अगदी वापरायची भांडी आणि अन्न पॅकिंगच्या पद्धतीही बदलल्या आहेत. काळाबरोबर आलेले असे बदल आयुष्याला अनेक प्रकारे सुकर करत असले तरी, त्यातील अनेक गोष्टी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतील. यातीलच एक गोष्टी म्हणजे नॉन-स्टिक पॅनमध्ये (Nonstick Pan) स्वयंपाक करणे.
तर किचनमध्ये स्वयंपाक करत असताना अनेकदा तव्यातून धूर निघतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, हा धुर तुम्हाला आजारी देखील बनवू शकतो. विश्वास बसत नाही ना, मात्र हे खरे आहे. अमेरिकेत एक नवीन रोग पसरत आहे, ज्याला टेफ्लॉन फ्लू (Teflon Flu) किंवा पॉलिमर फ्यूम फिव्हर असे नाव देण्यात आले आहे. 250 हून अधिक अमेरिकन या आजाराचे बळी आहेत. परिस्थिती इतकी बिकट आहे की प्रत्येकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते.
टेफ्लॉन फ्लूचा प्रसार घरात ठेवलेल्या भांड्यांमुळे होतो. विशेषत: नॉनस्टिक भांडी या फ्लूला कारणीभूत ठरत आहेत. नॉनस्टिक भांडी जास्त गरम केल्यावर त्यातून निघणारा धूर शरीरात जातो आणि टेफ्लॉन फ्लूला जन्म देतो. कधीकधी नॉनस्टिक भांड्यांवरील लेप निघतो आणि अन्नात मिसळतो. त्यानंतर तो शरीरात प्रवेश करून मोठा धोका निर्माण करू शकतो. अहवालानुसार, यामुळे फुफ्फुसात जळजळ होऊ शकते आणि फ्लू सारखी लक्षणे दिसू शकतात. टेफ्लॉन फ्लूचे परिणाम थोड्याच वेळात शरीरावर दिसू लागतात. (हेही वाचा: Lung Disease Due To Pigeons: कबूतरांच्या सतत संपर्कात राहिल्याने होऊ शकतो फुफ्फुसाचा गंभीर आजार; दिल्ली रुग्णालयाच्या अभ्यासात समोर आली धक्कादायक माहिती)
तर टेफ्लॉन एक प्रकारचे कृत्रिम रसायन आहे. कार्बन आणि फ्लोरिनपासून बनलेल्या या रसायनाला पॉलिटेट्राफ्लुरोइथिलीन (PTFE) म्हणतात. नॉनस्टिक पॅनमध्ये स्वयंपाक करणे खूप सोपे आहे, परंतु अशी भांडी 500 डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त गरम करणे महाग ठरू शकते. यामुळे टेफ्लॉन वितळते आणि अन्नामध्ये विरघळते.
हा फ्लू टाळण्यासाठी काही प्रभावी मार्ग-
- प्रथम, नॉनस्टिक पॅन जास्त गरम करणे टाळा.
- गॅसवर नॉनस्टिक पॅन किंवा इतर कोणतेही भांडे ठेवण्यापूर्वी त्यात थोडे तेल किंवा तूप घाला.
- स्वयंपाक करताना एक्झॉस्ट फॅन वापरा किंवा खिडक्या उघड्या ठेवून अन्न शिजवा जेणेकरून धूर पसरणार नाही.
- तुमचा नॉनस्टिक पॅन स्क्रॅच झाला असेल तर लगेच बदला.
(टीप- वरील लेखातील माहिती इंटरनेट आधारीत आहे. लेटेस्टली मराठी याची पुष्टी करत नाही. कोणत्याही आजाराबाबत किंवा लक्षणांबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.)