धक्कादायक! सुरत येथील नागरिकांना न्युमोनिया आजाराची लागण, तापामुळे २० दिवसांत ११ जणांचा मृत्यू
धक्कादायक म्हणजे केवळ २० दिवसांत ११ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. माहितीनुसार, १२ हून अधिक रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. तसेच गेल्या गुरुवारी न्युमोनिया आणि तापामुळे दोघांचा मृत्यू आहे. यामुळे आरोग्य विभाग चिंता व्यक्त करत आहे. तसेच रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची योग्य चाचणी केली जात आहे.
सुरत (Surat) येथे तापामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक म्हणजे केवळ २० दिवसांत ११ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. माहितीनुसार, १२ हून अधिक रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. तसेच गेल्या गुरुवारी न्युमोनिया आणि तापामुळे दोघांचा मृत्यू आहे. यामुळे आरोग्य विभाग चिंता व्यक्त करत आहे. तसेच रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची योग्य चाचणी केली जात आहे.
सुरत येथील सचिन परिसरातील एका महिला आणि ६ महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोग्य विभाग या तापावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक चाचण्या करत आहेत. माहितीनुसार, या तापामुळे रुग्णांना अधिक थंडी जाणवते. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभागाने रुग्णालयाला सावधान राहण्याचे इशारा दिला आहे. हे देखील वाचा-प्रवासादरम्यान उलट्या होण्याच्या समस्येचे निराकरण करतील हे 5 घरगुती उपाय
तसेच गुजरात आणि उत्तर प्रदेशातही अशा प्रकारचे रुग्ण आढळले आहेत. या ठिकाणीही २ मुलांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या तमाम प्रयत्नानंतरही त्यांची हाती अपयश आले आहे. परंतु लवकर या परिस्थितीवर नियंत्रण मिळवू, अशी अशा आरोग्य विभागाकडून रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे.