Side Effects Of Covishield: 'कोविशील्ड लसीच्या दुष्परिणामांची माहिती आधीच देण्यात आली होती'; Serum Institute चे मोठे वक्तव्य

यानंतर जगभर खळबळ उडाली. सीरम इन्स्टिट्यूट ही लस भारतात बनवत होती, पण भारतात बनवल्या जाणाऱ्या लसीचे नाव कोविशील्ड आहे.

Serum Institute

Side Effects Of Covishield: ब्रिटीश फार्मास्युटिकल कंपनी ॲस्ट्राझेनेका (AstraZeneca) ने कोरोना लस कोविशील्ड (Covishield) चे दुष्परिणाम लक्षात घेऊन, जगभरातून ही लस मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय या लसीचे उत्पादनही बंद करण्यात आले आहे. अशात आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) कडूनही एक मोठे विधान समोर आले आहे. सीरम इन्स्टिट्यूटने भारतात कोविशील्ड लस तयार करून बाजारात उपलब्ध करून दिली होती.

सीरम इन्स्टिट्यूटने बुधवारी सांगितले की, त्यांनी 2021 मध्येच लसीच्या पुरवठ्याच्या सुरुवातीला पॅकेजिंग इन्सर्टमध्ये थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) यासह लसीचे इतर सर्व दुष्परिणाम उघड केले होते. म्हणजेच सीरमच्या निवेदनानुसार त्यांनी या लसीच्या दुष्परिणामाबद्दल आधीच माहिती दिली होती.

काही दिवसांपूर्वी ब्रिटीश फार्मास्युटिकल कंपनी ऑक्सफोर्ड-ॲस्ट्राझेनेकाने यूके हायकोर्टात दिलेल्या न्यायालयीन कागदपत्रांमध्ये प्रथमच कबूल केले होते की, त्यांच्या कोविड लसीचे काही दुर्मिळ दुष्परिणाम समोर येऊ शकतात. यानंतर जगभर खळबळ उडाली. सीरम इन्स्टिट्यूट ही लस भारतात बनवत होती, पण भारतात बनवल्या जाणाऱ्या लसीचे नाव कोविशील्ड आहे. ज्या फॉर्म्युल्यापासून ऑक्सफोर्ड-ॲस्ट्राझेनेकाची लस ‘व्हॅक्सजावेरिया’ बनवली जाते त्याच सूत्रानुसार कोविशील्डही बनवली जाते.

आता ॲस्ट्राझेनेकाने लस मागे घेतली आहे, परंतु सिरम इन्स्टिट्यूटने अद्याप लस मागे घेण्याचा निर्णय घेतलेला नाही. ॲस्ट्राझेनेकाने लसीची अद्ययावत आवृत्ती बाजारात आणली आहे आणि जुन्या आवृत्तीचा स्टॉक परत मागवला आहे. कंपनीने 5 मार्च रोजी व्हॅक्सजवेरियाला बाजारातून काढून घेण्याचा निर्णय घेतला होता, परंतु 7 मे रोजी या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. सीरम इन्स्टिट्यूटने म्हटले आहे की डिसेंबर 2021 मध्ये लसीची मागणी कमी झाली होती, त्यामुळे कंपनीने त्याचे उत्पादन आणि पुरवठा थांबवला होता. (हेही वाचा: AstraZeneca Withdraws Covid Vaccine: कोविशील्ड बनवणारी कंपनी ॲस्ट्राझेनेकाचा मोठा निर्णय; गंभीर दुष्परिणामांच्या आरोपांदरम्यान जगभरातून परत मागवल्या सर्व लसी)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ॲस्ट्राझेनेकाने प्रथमच कबूल केले आहे की त्यांची लस घेतल्यानंतर, प्लेटलेट काउंट कमी होऊ शकतात आणि शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. युरोपमध्ये लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच या समस्येचे पहिले प्रकरण उघडकीस आले, तेव्हा युरोपीय देशांनी ॲस्ट्राझेनेकाची वॅक्सजाव्हरिया ही लस वापरणे बंद केले. लसीकरण मोहिमेदरम्यान भारतात दिलेल्या 220 कोटी डोसपैकी 79% पेक्षा जास्त डोस हे कोविशील्ड डोस होते.