ऋजुता दिवेकरच्या या खास '5'डाएट टीप्सने ठेवा रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात !

म्हणूनच आहारतज्ञ ऋजुता दिवेकरच्या या खास सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका

ऋजुता दिवेकरच्या खास डाएबेटीक टीप्स ( Photo Credit: Instagram and.pexels.com

मधुमेहींसाठी सर्वात मोठं आव्हान असते ते म्हणजे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणं. आहराचं पथ्यपाणी योग्यरित्या न सांभाळल्यास शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण वर- खाली जाते. रक्तातील साखर अचानक अधिक प्रमाणात वाढण्यास त्यामधून इतर अवयवांवर ताण येतो. म्हणोऔन औषधोपचारांसोबत आहाराचं गणित सांभाळताना सेलिब्रिटी न्युट्रीशनिस्ट ऋजुता दिवेकरने दिलेल्या या काही टीप्स सांभाळल्यास नक्कीच रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणार्‍या खास टीप्स

1. दिवसाची सुरूवात फळं किंवा बदाम खाऊन करा

ऋतूमानानुसार बाजरात उपलब्ध असलेली फळं खाणं हे शरीरासाठी फारच पोषक आहे. सकाळी चहा, कॉफी पिण्याआधीच फळं किंवा किमान केळं खाऊन दिवसाची सुरूवात करा. फळांसोबतच भिजवलेले आणि सोललेले बदाम खाणंदेखील उत्तम पर्याय आहे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

2. दुपारच्या जेवणाची वेळ

मधुमेहींनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी खाण्याच्या वेळा सांभाळणं गरजेचे आहे. मधुमेहींनी सकाळी 11 ते 1 या वेळेत जेवणं आवश्यक आहे. तसेच दुपारच्या जेवणानंतर ताक किंवा छास पिणं फायदेशीर आहे. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास फायदेशीर ठरते

3. अवेळी लागणार्‍या भूकेवर शेंगदाणे फायदेशीर

दुपारच्या जेवणानंतर अनेकदा अवेळी भूक लागते. यावेळेस काही चूकीचे पदार्थ खाऊन आपण नकळत काही समस्यांना आमंत्रण देतो. मधुमेहींनी अशावेळेस मूठभर शेंगदाणे खाणं फायदेशीर आहे. यामधून शरीराला अमायनो अ‍ॅसिड, मिनरल्स, व्हिटॅमिन्सचा पुरवठा होतो.

4.चहामध्ये 1 टीस्पून साखर पुरेशी, अधिक स्वीटनर्स मिसळू नका

चहा पिताना त्यामध्ये साखर किंवा त्याला पर्याय म्हणून स्वीटनर्स मिसळणं आरोग्याला अधिक त्रासदायक ठरू शकते. आर्टिफिशिएअल शुगर वापरणं आरोग्याला त्रासदायक आहे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण बिघडते. सोबतच मधुमेहींच्या हृद्य, किडनी, न्युरो मस्क्युलर कार्यावरही परिणाम होतो. त्यापेक्षा एक टीस्पून साखर चहा मिसळून पिण्याची सवय ठेवा.

5. आठवड्याततून दोनदा वेट ट्रेनिंग

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यसाठी व्यायाम करणं आवश्यक आहे. यासाठी वेट ट्रेनिंग करणंही तितकेच आवश्यक आहे. मस्क्युलर स्ट्रेन्थचाही शरीरातील इन्सुलिनच्या पातळीवर परिणाम होतो.