Paxlovid, Pfizer ची कोविड 19 अ‍ॅन्टीवायरल गोळी 89% प्रभावी; Omicron Variant च्या संसर्गालाही रोखण्यास सक्षम

फायजर ची अ‍ॅन्टिवायरल गोळी कोविड 19 ने संक्रमित लोकांना देखील गंभीर आजाराचा धोका कमी करण्यास मदत करणार असल्याचं म्हटलं आहे.

Pill। Image Used For Representational Purpose (Photo Credits: ANI)

कोरोना संकट थोडं आटोक्यात आल्याची चिन्हं असतानाच आता ओमिक्रॉन (Omicron Variant) या नव्या कोरोना व्हेरिएंट (Corona Variant) मुळे सर्वत्र धाकधूक वाढली आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट धुमाकूळ घालत असताना आता त्याच्या बाबत एक दिलासादायक बाब समोर आली आहे. फायजर (Pfizer) कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कोविड 19 अ‍ॅन्टिवायरल पिल PAXLOVID द्वारा कोरोनाचा मुकाबला करता येणं शक्य आहे. अंतिम टप्यातील चाचण्यांमध्ये त्याची ट्रायल्स 89% असल्याचं समोर आलं आहे. काल अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन ( US President Joe Biden) यांनी देखील या बातमीला दुजोरा देत समाधान व्यक्त केले आहे.

फायजर ची अ‍ॅन्टिवायरल गोळी कोविड 19 ने संक्रमित लोकांना देखील गंभीर आजाराचा धोका कमी करण्यास मदत करणार असल्याचं म्हटलं आहे. लसीकरणासोबतच आता कोविड 19 अ‍ॅन्टिवायरल गोळी ही कोरोना विरूद्ध लढाईसाठी नवं शस्त्र आहे. आता ओमिक्रोन चा देखील सामना करणं या औषधामुळे शक्य होणार आहे. हे देखील वाचा: Covid-19 Vaccine: 5-11 वर्षांच्या मुलांसाठी Pfizer ची लस सुरक्षित; क्लिनिकल ट्रायलच्या रिझल्ट्समध्ये व्हायरसवर ठरली प्रभावी .

ANI Tweet

अंतरिम निकालाच्या माहितीनुसार 1200 जणांवर कोविड 19 गोळ्यांची चाचणी करण्यात आली होती. आता अंतिम चाचणीच्या निकालासाठी 4 नोव्हेंबर पर्यंत 2246 जणांची नोंदणी करण्यात आली आहे. 5 दिवसांसाठी दर 12 तासांनी Paxlovid किंवा placebo रॅन्डमली प्रत्येक रूग्णाला दिली जाते. यामध्ये फायझरची ट्रीटमेंट मिळालेल्यांमध्ये कोणाचाही कोविड 19 मुळे मृत्यू झालेला नाही.

फायजर च्या पूर्वी जर्मन कंपनी मर्क कडून मोल्नुपिराविर ही कोविड टॅबलेट बनवण्यात आली आहे. ब्रिटन सरकारने मागील महिन्यात सशर्त मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान कोविड विरूद्ध औषधाला मंजुरी देणारा ब्रिटन हा पहिला देश ठरला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif