Men are Losing Y Chromosomes: पुरुष प्रजाती लवकरच होऊ शकते विलुप्त; Y गुणसूत्र संपण्याच्या मार्गावर, शास्त्रज्ञांच्या खुलाशामुळे जगभरात खळबळ

या प्रजाती पार्थेनोजेनेसिस म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रक्रियेद्वारे अंडी तयार करू शकतात. परंतु हे मानवांमध्ये किंवा इतर सस्तन प्राण्यांमध्ये होऊ शकत नाही.

Sperm and egg (Photo Credits: Flickr, Maria Mellor)

मानव आणि इतर सस्तन प्राण्यांचे लिंग Y गुणसूत्रावरील (Y Chromosome) पुरुष-निर्धारित जनुकाद्वारे निर्धारित केले जाते. परंतु आता मानवी Y गुणसूत्र कमी होत चालल्याचे दिसून आले आहे व काही दशलक्ष वर्षांत ते अदृश्य होऊ शकते. म्हणूनच जर आपण नवीन लैंगिक जनुक विकसित केले नाही तर पुरुष जाती नामशेष होऊ शकते. शास्त्रज्ञांच्या या धक्कादायक खुलाशामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे उंदीरांच्या दोन प्रजातींनी त्यांचे Y गुणसूत्र आधीच गमावले आहे आणि ते अजूनही जिवंत आहेत. ही बाब पुरुष प्रजाती टिकवण्यासाठी आशेचा किरण आहे.

नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सच्या प्रोसिडिंग्जमधील एका नवीन पेपरमध्ये उंदराने नवीन नर-निर्धारित जनुक कसे विकसित केले आहे हे दाखवले आहे. मानव आणि  इतर सस्तन प्राण्यांतील मादींमध्ये दोन X गुणसूत्र असतात आणि पुरुषांमध्ये एक X आणि एक लहान गुणसूत्र असते ज्याला Y म्हणतात. X मध्ये जवळपास 900 जनुके असतात जी सर्व प्रकारच्या लिंग-संबंधित गोष्टींशी निगडीत आहेत. परंतु Y मध्ये काही जीन्स (सुमारे 55) आणि भरपूर नॉन-कोडिंग DNA आहेत- जे काहीही करत नाहीत.

परंतु Y क्रोमोझोम काहीतरी विशेष करतो कारण त्यात एक महत्त्वाचा जनुक असतो, जो गर्भामध्ये पुरुषांच्या विकासास सुरुवात करतो. गर्भधारणेनंतर सुमारे 12 आठवड्यांनंतर, हे मास्टर जनुक अंडकोषाच्या विकासावर नियंत्रण ठेवणाऱ्या इतर जनुकांजवळ जाते. गर्भाच्या अंडकोषातून पुरुष संप्रेरके (टेस्टोस्टेरॉन आणि त्याच्याशी संबंधित हार्मोन्स) तयार होतात, ज्यामुळे बाळाचा मुलगा म्हणून विकास होतो.

या मास्टर सेक्स जनुकाची ओळख 1990 मध्ये SRY म्हणून झाली. आता समोर आले आहे की, या Y गुणसूत्राने 166 दशलक्ष वर्षांमध्ये 900 पैकी 55 सक्रिय जीन्स गमावले आहेत. म्हणजेच दर दशलक्ष वर्षांमध्ये सुमारे पाच जनुके गमावली आहेत. हे प्रमाण असेच राहिले तर, तर शेवटची 55 जीन्सही एक कोटी 10 लाख वर्षांत निघून जातील. परंतु चांगली बातमी अशी आहे की, शास्त्रज्ञांना दोन उंदीर वंश माहित आहेत ज्यांनी त्यांचे Y गुणसूत्र आधीच गमावले आहे परंतु अजूनही ते जिवंत आहेत.

पूर्व युरोपमधील मोल वोल्स आणि जपानमधील स्पायनी रॅट्स यांच्या शरीरातील वाय आणि एसआरवाय क्रोमोझोम्स संपुष्टात आली आहेत. मात्र दोन्ही लिंगांमध्ये म्हणजेच मादी आणि नरांमध्ये एक्सएक्स क्रोमोझोम पाहायला मिळत आहेत. आता या प्रजातींवर संशोधन सुरु आहे. (हेही वाचा: Male Infertility due to Cycling: जास्त सायकलिंगमुळे पुरुषांमध्ये वाढू शकतो नपुंसकत्वाचा धोका; अभ्यासात खुलासा)

दुसरीकडे, काही सरडे आणि सापांच्याही केवळ मादी प्रजाती आहेत. या प्रजाती पार्थेनोजेनेसिस म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रक्रियेद्वारे अंडी तयार करू शकतात. परंतु हे मानवांमध्ये किंवा इतर सस्तन प्राण्यांमध्ये होऊ शकत नाही, कारण आपल्याकडे किमान 30 महत्त्वाची जीन्स आहेत जी शुक्राणूंद्वारे पुरुषाकडून येतात तेव्हाच कार्य करतात. पुनरुत्पादनासाठी, आपल्याला शुक्राणूंची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आपल्याला पुरुषांची आवश्यकता आहे. याचा अर्थ Y गुणसूत्राचा अंत मानवी वंशाच्या विलुप्तीची घंटा असू शकते.